"रामशास्त्री प्रभुणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२ बाइट्सची भर घातली ,  ५ महिन्यांपूर्वी
छो
 
पेशवाईत सुरू असलेली वेठबिगारीची प्रथा रामशास्त्रींनी बंद करविली. [[नारायणराव पेशवे]] यांच्या खुनानंतर [[रघुनाथराव पेशवे]] बळजबरीने करीत असलेल्या कारभाराला विटून रामशास्त्रींनी आपल्या न्यायाधीशपदाचा राजीनामा दिला आणि ते माहुलीस परतले. [[सवाई माधवराव पेशवे]] यांच्या जन्मानंतर [[नाना फडणीस]] आणि [[सखारामबापू]] यांनी रामशास्त्रींना परत बोलावून सरन्यायाधीशपदावर बसविले. पण हेच सखारामबापू जेव्हा रघुनाथराव आणि इंग्रजांशी संधान बाधू लागले, तेव्हा बापूंचे वय आणि प्रतिष्ठा हे सर्व विसरून फितुरीबद्दल रामशास्त्रींनी त्यांना तुरुंगवासाची शिक्षा दिली.
 
पुण्यात असताना रामशास्त्रींनी समाज सुधारणेचे काम हाती घेतले. सरदार [[परशुरामभाऊ पटवर्धन]] यांची विधवा कन्या बयाबाई हिला त्यांनी पुनर्विवाहाची परवानगी दिली, पण समाजाच्या दडपणाला घाबरून पटवर्धनांनी तिचा पुनर्विवाह केला नाही आणि बालविधवांना पुन्हा संसारसुख देण्याचे रामशास्त्रींचे प्रयत्‍न फसले. आपल्या आयुष्याचा शेवट जवळ आला असे वाटल्यावर त्यांनी आपल्या पत्‍नीस त्यांच्या शवाबरोबर सती न जाण्याचा उपदेश केला, आणि सतीची माणुसकीविहीन प्रथा संपविण्याचा आपल्या परीने प्रयत्‍न केला.
 
==रामशास्त्री प्रभुणे यांच्यावरील पुस्तके/चित्रपट==
३१५

संपादने