"बायजाबाई शिंदे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ जोडला
छोNo edit summary
ओळ ४:
 
{{विकिकरण}}
बायजाबाई (माहेरच्या घाटगे) या आजच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील होत्या. कागल येथील देशमुखी घाटगे घराण्याकडे होती. या घराण्यातील एक शूर पुरुष सखाराम म्हणजेच सर्जेराव घाटगे हे परशुराम[[परशुरामभाऊ पटवर्धन]] यांच्याकडे नोकरीस होते. पटवर्धन यांच्यामुळे त्यांचे पुण्यात पेशव्यांकडे येणे-जाणे होऊ लागले. सर्जेराव घाटग्यांचे गुण पाहून त्यांनी पुण्यातच राहावे अशी विनंती नाना फडणवीसांनी केली आणि घाटगे पुणे दरबारातच रुजू झाले. पुढे सवाई माधवरावांच्या मृत्यूनंतर दुसरे बाजीराव पेशवेपदी आले तेव्हाच्या काळामध्ये महादजी शिंदे यांचे दत्तकपुत्र दौलतराव शिंदे यांच्याशी सर्जेराव घाटग्यांचा संपर्क आला.
 
सर्जेराव घाटगे यांच्या मुलीशी दौलतराव शिंदे यांनी विवाह करावा असा प्रस्ताव दुसऱ्या बाजीरावांनी मांडला. ही कन्या म्हणजेच बायजाबाई शिंदे होय. त्यानंतर शिंदे यांच्या दिवाणपदावर सर्जेराव घाटगे यांची नेमणूक झाली आणि १७८८च्या मार्च महिन्यात बायजाबाई घाटगे आणि दौलतराव शिंदे यांचा विवाह झाला.