"सिंह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २९:
'''सिंह''' हा जंगलाचा राजा म्हणून ओळखला जातो. तो मांसभक्षक प्राणी आहे. सिंहाचे शास्त्रीय नाव 'पँथेरा लिओ' आहे. शूर माणसाला सिंहाची उपमा देतात.
 
जगभरात [[आशियाई]] किंवा [[आफ्रिकन]] या दोन प्रकारचे सिंह आढळतात. आशियाई सिंहांचे अस्तित्व हे पूर्वापार भारतातच राहिले असून गेल्या काही वर्षांपासून तर ते [[गुजरात]]मधील [[गीर]]पुरतेच उरले आहे. [[आशियाई सिंह]] एकेकाळी [[ग्रीस]]पासून [[मध्य भारत|मध्य भारतात]] [[मध्यप्रदेश]],[[उत्तर भारत|उत्तर भारतात]] [[बिहार]]पर्यंत होते. पण शिकारीमुळे ते आता फक्त गीर जंगलात मिळतात. परंतु काही संशोधक लेखकांच्या मते सिंह हा मूळचा भारतातील नसून तो बाहेरून भारतात आणाला गेला व त्यामुळेच त्यांची संख्या इतकी कमी आहे.<ref> [http://books.google.co.in/books?id=jcqPAAAAQBAJ&q=lion+not+indigenous#v=snippet&q=lion%20not%20indigenous%20to%20india&f=false गुगल बुक्सवरील ''एक्झॉटिक एलियन्स : द लायन ॲन्ड द चिता इन इंडिया'']</ref>
 
वाघांप्रमाणेच सिंहांची शिकार हा स्वातंत्र्यपूर्व काळात राजेमहाराजांचा छंद होता. जुनागडच्या नवाबाने मात्र विसाव्या शतकाच्या प्रारंभी सिंहांच्या शिकारींवर पूर्णत: बंदी घातली. त्याकाळी सिंहांची संख्या तेरावर आली होती, अशी एक आकडेवारी सांगितली जाते. मात्र ही संख्या नेहमीच वादग्रस्त राहिली. काहींच्या मते प्रत्यक्षात ती संख्या शंभराच्या आसपास होती. ते काहीही असले, तरी १९१० पर्यंतच्या काळात हे संकट ओळखले गेले. साहजिकच त्यापुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सिंहांनाही अस्तित्व धोक्यात आलेल्या प्रजातींच्या यादीत टाकण्यात आले आणि त्यादृष्टीने काही पावले उचलली गेली. गुजरातेतले [[गीर अभयारण्य|गीर]] हे सिंहांसाठी संरक्षित वनक्षेत्र जाहीर करण्यात आले. गीरमधील सिंहांना आशियाई सिंहांप्रमाणेच इंडियन लायन असेही म्हणतात. आज २०१० साली गीरमध्ये ४११ सिंह आहेत. १९१० ते २०१० या काळात ३९८ सिंह वाढले.
"https://mr.wikipedia.org/wiki/सिंह" पासून हुडकले