"वटवाघूळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २०:
 
== देशोदेशीचे शुभ-अशुभ ==
वटवाघळांना काही देशांमध्ये शुभ तर काही देशांमध्ये अशुभ मानले जाते. काही ठिकाणी वटवाघळांना [[भूत]], [[मृत्यू]] आणि [[रोग]] यांचे प्रतीक मानतात.
* [[चीन]]मध्ये वटवाघळांना [[दीर्घायुष्य]] आणि आनंदाचे प्रतीक समजतात.
* [[पोलंड]]मध्ये वटवाघळांना शुभ मानले जाते. एका पुराणकथेनुसार वटवाघळांना माणसाच्या केसांमध्ये घुसायला आवडते; पण त्यामागचे खरे कारण म्हणजे डास आणि इतर कीटक माणसाच्या डोक्‍याभोवती घोंघावत असताना, त्यांना खाण्यासाठी वटवाघळे येतात आणि ती चुकून माणसांच्या केसांमध्ये घुसतात.
* [[इंग्लंड]]मध्ये वटवाघळांची खूप काळजी घेतली जाते, आणि त्यांना किंवा त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी कसली इजा होईल अशी कृती केली, तर त्या माणसाला मोठा दंड केला जातो.
* [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतल्या]] [[टेक्‍सास]] राज्यातल्या ऑस्टिनमध्ये तर सुमारे १५ लाख वटवाघळांचे एक अभयारण्यच आहे. सूर्यास्ताच्या सुमाराला ही वटवाघळे आपल्या घरट्यांमधून बाहेर पडतात. ते पाहण्यासाठी लाखभर पर्यटक तिथे गोळा होतात.
* [[पुणे|पुण्याजवळच्या]] [[चिंचवड]]-[[निगडी]] येथेही रोज संध्याकाळी हजारोंच्या संख्येने अशीच वटवाघळे एका दिशेकडून दुसऱ्या दिशेला जाताना दिसतात, आणि पहाटे उलट्या दिशेने. हा कार्यक्रम प्रत्येक दिशेने सुमारे तासभर चालतो.
* [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] फारशी वर्दळ नसलेल्या लेणी आणि गुहांमध्ये वटवाघळे हटकून सापडतात.
* वटवाघळाला उलटे लोंबायला आवडते. विजेच्या तारेला लोंबताना एखाद्या वटवाघळाचा खाली असलेल्या दुसऱ्या तारेशी संपर्क होते आणि ते वटवाघूळ तिथेच चिकटून राहते आणि मृत्युमुखी पडते.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/वटवाघूळ" पासून हुडकले