"झाडीबोली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ९५:
पौराणिक, ऐतिहासिक नाटकांचे प्रयोग झाल्यावर नवेगावबांधच्या नाट्य मंडळाने प्रस्तुत केलेल्या नाटक प्रयोगांनी प्रभावित होऊन तत्कालीन कलेक्टर स्मिथ यांनी श्री बालाजी प्रासादिक नाट्य मंडळाचे कर्तेधर्ते सीताराम पाटील डोंगरवार यांचा पदक देऊन त्यांचा गुणगौरव केला. आजही ते मेडल सीताराम पाटलांचे नातू नारायण माधवराव डोंगरवार, रा.धाबेपवनी (जि.गोंदिया) यांच्या घरी जपून ठेवले आहे. झाडीपट्टी रंगभूमीच्या इतिहासातील हा एक सुवर्णक्षण असून झाडीच्या रंगभूमीचा प्रभाव आणि लोकप्रियता यातून स्पष्ट होते.
सीताराम पाटील डोंगरवार यांच्या नेतृत्वात नवेगावबांध येथील कलाकार मंडळींनी सिंहाचा छावा हे संगीत नाटक सादर केले. या नाटकात अरण्यपुत्र माधवराव डोंगरवार, रामकृष्ण डोंगरवार, लटारू पोतदार, गणा गायकवाड, सीताराम पवार, काशिनाथ डोंगरवार, आत्माराम बाळबुद्धे, पंढरी डोंगरवार, हरी खुणे, पांडुरंग बोरकर, रामा डोंगरवार यांनी अभिनय केला होता, अशी माहिती उपलब्ध आहे.
कलेला कसलेही बंधन नसतात.केवळ अंगभूत असलेल्या कलेच्या जोरावर येथील कलावंत रंगभूमीवर आपली कला सादर करीत आहे. परंतु झाडीपट्टीमध्ये अभिनय, संगीत यांचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था निर्माण झाल्यास झाडीपट्टी रंगभूमीचे भविष्य आणखी उज्वल होऊ शकते.झाडीपट्टी रंगभूमीने आपले वेगळे पण जपत प्रादेशिक भान ठेवून जागतिकीकरणातही आपले स्थान अबाधित ठेवले आहे. झाडीपट्टी रंगभूमी ही महाराष्ट्रातील एक वैशिष्ट्यपूर्ण अशी रंगभूमी आहे या रंगभूमीने समग्र भारतीय रंगभूमीला सशक्त कलावंत दिलेले आहेत .भारतीय रंगभूमी समृद्ध करण्यात झाडीबोलीत पट्टी रंगभूमी चे योगदान हे अनमोल आहे . झाडीपट्टी रंगभूमी या देशातील एक अतिशय समृद्ध अशी रंगभूमी आहे .झाडीपट्टी रंगभूमीवर संशोधन होणे ही काळाची गरज आहे.
 
==झाडीबोली भाषेतील काही शब्द व त्याचे मराठीतील अर्थ==
"https://mr.wikipedia.org/wiki/झाडीबोली" पासून हुडकले