"कोल्हापूर जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २८:
कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील शेवटचा जिल्हा असुन त्याच्या पश्चिम-नैर्ऋत्येला [[सिंधुदुर्ग जिल्हा]], पश्चिम-वायव्येला [[रत्‍नागिरी जिल्हा]], उत्तर-ईशान्येला [[सांगली जिल्हा]] तर दक्षिणेला [[कर्नाटक|कर्नाटकमधील]] [[बेळगाव जिल्हा]] आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेला [[सह्याद्री|सह्याद्रीची]] रांग असून तेथील भाग डोंगराळ आहे.
 
भौगोलिकदृष्ट्या जिल्ह्याचे पश्चिम रांग , मध्य रांग आणि पूर्व रांग असे तीन विभाग मानले जातात. मध्य आणि पूर्व भागातील माती अग्निजन्य खडकापासून बनली असल्याने काळ्या रंगाची आहे तर पश्चिम भागात घाटातील डोंगराळ भागातील जांभ्या खडकापासून बनलेली लाल माती आहे. या भागातील बहुतेक जमीन जंगलाने व्यापली आहे.कोल्हापूर व रत्‍नागिरीला जोडणारा आंबा घाट, सिंधुदुर्ग जिल्ह्याला जोडणारा करूळ व फोंडा घाट, तसेच सावंतवाडीला जोडणारा आंबोली घाट हे पश्चिम महाराष्ट्र व कोकणाला जोडणारे प्रमुख घाट या जिल्ह्यात आहेत. या घाटांचा फक्त घाटमाथाच कोल्हापूर जिल्ह्यात आहे. कोल्हापूर - मिरज हा एकमेव लोहमार्ग जिल्ह्यातून जातो. पुणे, मुंबई ही राज्यातील महत्त्वाची शहरे लोहमार्गाद्वारे कोल्हापूरला जोडली गेली आहेत.
 
जिल्ह्यात [[पंचगंगा]], [[वारणा]], [[दुधगंगा]], [[वेदगंगा]], [[भोगावती]], [[हिरण्यकेशी नदी]] आणि [[घटप्रभा]] या प्रमुख नद्या आहेत. या नद्या पश्चिम घाटात उगम पावून पूर्वेकडे वाहतात. पंचगंगा नदी [[कासारी नदी|कासारी]], [[कुंभी]], [[तुळशी]] सरस्वती(गुप्त नदी) आणि भोगावती या उपनद्यांपासून बनली आहे. [[कृष्णा]] नदी जिल्ह्याच्या पूर्व सीमेवरुन वाहते तर [[तिल्लारी]] नदी पश्चिम सीमेवरून वाहते.