"सोलापूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
शिक्षणक्षेत्र व सहकार क्षेत्रात सोलापूरचे नाव उंचावले. समाजातील कष्टकरी लोकांच्या हाताला काम मिळावे म्हणून कारखाना उभारला.शिक्षण मिळावे म्हणून शैक्षणिक संस्था उभारल्या.आरोग्य सेवा मिळावी म्हणून हाॅस्पिटल उभारले.
No edit summary
ओळ ५५:
*सोलापूर शहर हे हुतात्मा शहर म्हणून ओळखले जाते .
 
सोलापूरला एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.सोलापूराचे प्राचीन म्हणजे १२व्या शतकातील रहिवासी "श्री.शिवयोगी सिद्धेश्वर" यांनी या परिसरात अडुसष्ट शिवलिंगांची स्थापना केली वीरशैव धर्माच्या (शैव पंथ) माध्यमातून समाज सुधारणांचे काम केले. सोलापूर [[तलाव]] बांधून त्यांनी सोलापूराची [[पाणी]] समस्या सोडवली. [[इ.स.पू. २००]] वर्षापासून [[सातवाहन]], [[चालुक्य]], [[राष्ट्रकूट]], [[यादव]], [[बहामनी]], [[अहमदनगर]]ची [[निजामशाही]], [[आदिलशाही]], मराठे-[[पेशवे]] व [[ब्रिटिश]] या सर्व राजवटी सोलापूर जिल्ह्याने अनुभवल्या. यादवांच्या काळात या भागाला सोन्नलगी म्हटले जात होते. [[मुघल]] राजवटीत यास संदलपूर असेही म्हटले जात होते. ब्रिटिश काळात सोलापूर हे नाव रूढ झाले असावे असा अंदाज व्यक्त केला जातो. सोलापूरला सोन्नलगिरी, गिरणगाव अशा नावानेही ओळखले जाते. सोलापूरचा [[इतिहास]] रोमांचक आहे. [[मुंबई]]-[[चेन्नई]] रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असल्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रीय पातळीवरील सर्व राजकीय-सामाजिक घडामोडींचे पडसाद सोलापूमध्ये उमटत असत. पहिल्या महायुद्धानंतर भारतात कामगारांनी मोठा संप पुकारला. सोलापूरलाही [[जानेवारी]], १९२० मध्ये कामगारांनी ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या विरोधात संप पुकारला होता.१९३० च्या [[सविनय कायदेभंग चळवळ]]ीत सोलापूरकर हिरिरीने सहभागी झाले होते. या सत्याग्रहात दारुबंदीचा प्रचार करण्यासाठी काही तरुण कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. या वेळी शंकर शिवदारे हा तरुण तिरंगा हातात घेऊन पुढे धावला व ब्रिटिशांच्या गोळीबारात बळी पडला. हा [[शंकर शिवदारे]] सोलापूरचा पहिला हुतात्मा. या हौतात्म्यामुळे सोलापूरकर पेटून उठले. पण दि. ८,९ मे, १९३० या दोन दिवसांत तत्कालीन कलेक्टर नाईट याने जमावांवर अमानुष गोळीबार केला. अनेक नागरिक गोळीबारात बळी पडले. या आंदोलनादरम्यान दि.९,१०,११ [[मे]], १९३० असे तीन दिवस सोलापूर ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली नव्हते, मुक्त होते. भारतातील (काही काळासाठी) ‘स्वतंत्र’ झालेला असा हा पहिला भाग! मे- जून, १९३०मध्ये सुमारे ४९ दिवस सोलापूरला मार्शल लॉ लागू केला होता. या काळात सोलापूरच्या ४ निरपराध युवकांना फाशी देण्यात आले. '''अब्दुल कुर्बान हुसेन, मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकिसन सारडा व जगन्नाथ शिंदे''' हे सोलापूरचे युवक दि. १२ जानेवारी, १९३१ रोजी धीरोदात्तपणे फासावर चढले. या प्रेरणादायी क्रांतिपर्वामुळेच सोलापूरला हुतात्म्यांचे शहर म्हटले जाते. पुतळ्यांच्या माध्यमातून आज या हुतात्म्यांची स्मृती सोलापुरात जतन करण्यात आली आहे. १९३०-३१ मधील या घटनांचे संदर्भ तत्कालीन ‘[[केसरी]]’ मध्ये आढळतात. १२ जानेवारी हा दिवस सोलापूरकर हुतात्मा दिन म्हणून पाळतात.{{संदर्भ हवा}}
 
तसेच पूर्वीचे गिरणगाव, हुतात्म्यांचे गाव, सध्याचे ज्वारीचे कोठार, तेलगू, कन्नड व मराठी असा भाषा-त्रिवेणी संगम झालेला बहुभाषिक जिल्हा आणि टॉवेल, चादरी निर्माण करणारा जिल्हा म्हणून सोलापूर प्रसिद्ध आहे. पर्यटन, फलोत्पादन, कृषी प्रक्रिया उद्योग, शिक्षण, आरोग्यसेवा व कापड उद्योग (हातमाग, यंत्रमाग) या क्षेत्रांमध्ये जिल्ह्याचा विकास साधण्याची क्षमता निश्चितच आहे. सोलापूर जिल्हा हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो .<ref>[http://solapur.gov.in/htmldocs/history.pdf ऐतिहासिक महत्त्व सोलापूर ,www.solapur.gov.in]</ref> हुतात्मा जगन्नाथ शिंदे हे सोलापूर शहरात दक्षिण कसबा येथे शिंदे चौकात राहत होते. सोलापूर शहराचे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान असल्याचे दिसून येते. हुतात्मा शिंदे ज्या वास्तूमध्ये राहत होते ती वास्तू आज मोडकळीस आली आहे. तेथे आज कोणी वास्तव्यास नाही. त्यांना मुले नव्हती. त्याच्या भगिनी ताराबाई ह्या शिक्षिका होत्या. १९३७ साली स्वतंत्र मजूर पक्षाच्या प्रचारासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोलापुरात आले होते. तसेच सोलापूर हे आंबेडकर चळवळीचे केंद्र आहे असे मानले जाते. पंढरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवीनी बांधलेला होळकर वाडा आहे. तसेच चंद्रभागा नदीवरील घाट ही पुण्यश्लोक अहिल्यादेवीनी बांधलेला आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/सोलापूर" पासून हुडकले