"नामदेव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २:
{{हा लेख| संत ज्ञानेश्वर समकालीन संत नामदेव (नामदेव दामाशेटी रेळेकर) |नामदेव (निःसंदिग्धीकरण)}}
 
''' संत शिरोमणी नामदेव महाराज''' (जन्म : २६ ऑक्टोबर १२७०; संजीवन समाधी : ३ जुलै १३५०) हे [[महाराष्ट्र]]ातील [[वारकरी]] संतकवी होते. त्यांचे आडनाव [[रेळेकर]] असे होते. ते [[मराठी भाषा|मराठी भाषांमधील]] सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक होते. त्यांनी [[व्रज]] भाषांमध्येही काव्ये रचली. [[शीख धर्म|शिखांच्या]] [[गुरू ग्रंथसाहिब]]ातहिले चरित्रकार, आत्मचरित्रकार आणि ‘कीर्तना’च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत[[पंजाब]]पर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते. त्यामुळे [[पंजाबी]] मंडळी तसेच संबंधित मंडळी आज त्यांच्या जन्मस्थानाचा,[[नरसी (नामदेव)|नरसी नामदेव]] यागावाचा विकास करण्यासाठी धडपडत आहेत. [[नरसी (नामदेव)|नरसी नामदेव]] हे गांव महाराष्ट्रातील [[मराठवाडा]] मधील हिंगोली जिल्ह्यातील असून तेथील संत नामदेव महाराज यांच्या मंदिराचा जीर्णोद्धार २०१९ ला झाला.
 
भक्तशिरोमणी संत नामदेव हे [[संत ज्ञानेश्वर|संत ज्ञानेश्वरांच्या]] कालखंडात होऊन गेले .वारकरी संप्रदायाचे प्रचारक नामदेव महाराज नामवेदाचे व नामविद्येचे आद्य प्रणेते असलेले महाराष्ट्रातील हे एक थोर संत होत. आपल्या कीर्तनकलेमुळे प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला लावणारी अशी त्यांची कीर्ती होती. संत नामदेव प्रत्यक्ष [[श्रीविठ्ठल|श्रीविठ्ठलाच्या]] निकटवर्ती असलेला सखा होता, असे मानले जाते. संत नामदेव हे वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक असून भारतभर त्यांनी त्या बाबतीत भावनिक एकात्मता साधली. [[भागवत धर्म|भागवत धर्माची]] पताका पंजाबपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य त्यांनी स्वकर्तृत्वाने केले.
 
दामाशेटी[[दामाशेट्टी]] हे संत नामदेवांचे वडील व [[गोणाई]] त्यांची माता होती. दामाशेटींचा व्यवसाय कपडे शिवणे हा होता. म्हणजे ते [[शिंपी]] होते. यांच्या अगोदरच्या सातव्या पिढीतील पुरुष [[यदुशेट]] हे सात्त्विक प्रवृत्तीचे भगवद्भक्त होते. सध्याच्या [[हिंगोली]] जिल्ह्यातील [[नरसी (नामदेव)|नरसी-बामणी]] [[नरसी (नामदेव)|(नरसी नामदेव)]] हे संत नामदेवांचे जन्म गाव होय. नामदेवांचा जन्म प्रभव नाम संवत्सरात, शके ११९२ (इ.स.१२७०) मध्ये कार्तिक शुद्ध एकादशीस, रोहिणी नक्षत्रास, रविवारी झाला. संत नामदेवांना ८० वर्षांचे आयुष्य लाभले. त्यांचे बालपण हे [[पंढरपूर|पंढरपुरात]] गेले. त्यांनी लहानपणापासूनच श्रीविठ्ठलाची अनन्यसाधारण भक्ती केली.
 
संत [[गोरा कुंभार]] यांच्याकडे, तेरढोकी येथे [[निवृत्तिनाथ|निवृत्तीनाथ]], [[ज्ञानेश्वर]] महाराज, [[सोपानदेव]], [[मुक्ताबाई]], संत नामदेव, [[चोखामेळा]], [[विसोबा खेचर]] आदी संतांचा मेळा जमला होता. याच प्रसंगी संत ज्ञानेश्वरांच्या विनंतीवरून गोरोबाकाकांनी उपस्थितांच्या आध्यात्मिक तयारीविषयी आपले मतप्रदर्शन केले होते. या प्रसंगानंतरच संत नामदेवांना विसोबा खेचर हे आध्यात्मिक गुरू म्हणून लाभले.
"https://mr.wikipedia.org/wiki/नामदेव" पासून हुडकले