"दिनकरराव गोविंदराव पवार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Reverted to revision 1702444 by (talk): Copyvio(TwinkleGlobal)
खूणपताका: उलटविले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ७:
बारामतीचे कृषी-विकास प्रतिष्ठान म्हणजे अप्पासाहेबांची सृजनशील अशी प्रयोगशाळाच होती. कृषी-विकास प्रतिष्ठानाच्या माध्यमातून अप्पासाहेब यांनी शेतीमध्ये विविध प्रयोग सुरू केले. कमी पाण्यात शेती पिकवायचे शिक्षण दुष्काळी भागाला मिळेल असे प्रयोग अप्पासाहेब यांनी केले.
 
विविध पिके वेगवेगळ्या हंगामात कशी पिकवावीत याची प्रात्यक्षिके त्यांनी दाखवली. शेतीला जोडून दूध व्यवसाय, कुक्कुटपालन, शेळी-मेंढी पालन, मधमाश्या पालन करून जोडधंदा कसा करावा याचे प्रशिक्षण त्यांनी शेतकऱ्यांनाe दिले. विदेशातील दुधाळ गाई या देशात निर्माण करण्यासाठी देशी गायींवर परदेशी वळूचा संकर करून दुधाचे उत्पादन त्यांनी वाढवून दाखवले. जमिनीतील तणावर उपाययोजना करण्यासाठी प्लास्टिकचा कागद जमिनीवर टाकून तणे वाढत नाहीत हा प्रयोग त्यांनी यशस्वी करून दाखवला.
 
इस्रायलच्या भेटीनंतर शेतीला पाणी देणाऱ्या परंपरागत पद्धतीत बदल करून ठिबक सिंचन करून उत्तम पीक काढता येते हे त्यांनी अनेक प्रयोग करून दाखवले.
ओळ १७:
अपार कष्ट करून अप्पासाहेबांनी बारामतीच्या दुष्काळी भागात छोट्या बंधाऱ्यांनी क्रांती केली. तालुक्यातील गो-पालन, कुक्कुटपालन, फळबागा या साऱ्यांचा नजरेत भरणारा विकास हे अप्पासाहेबांच्या दूरदृष्टीचे फळ होते.
 
अप्पासाहेब पवार सामाजिक कामातही रस घेत असत. शेतमजुरांच्या समस्या सोडविण्यास ते झटत. मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी अनेक संस्था उभारल्या. समाजात मुलींना शिक्षणाच्या आणि विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी १९८९-९० मध्ये मातोश्री शारदाबाई यांच्या नावे शारदानगरमध्ये स्वतंत्र संकुल उभारण्यात आले. त्यात कनिष्ठ-वरिष्ठ महाविद्यालय, व्यायामशाळा, शारीरिक शिक्षण, शिक्षणशास्त्र यांची महाविद्यालये, परिचारिका प्रशिक्षण केंद्र वगैरेंचा समावेश आहे. आज त्यांनी लावलेल्या या छोट्याशा रोपट्याचे वटवृक्ष रूपांतर झालेले आहे ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून बारामती व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून मोफत मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते कृषी प्रात्यक्षिके व कृषी प्रदर्शन या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक शेती संबंधी चे ज्ञान उपलब्ध करून दिले जाते
 
==अप्पासाहेब पवार यांनी लिहिलेली पुस्तके==