"पळस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: Reverted कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
छो Reverted 1 edit by Rlohakare (talk) to last revision by Nilesh Bhide(TwinkleGlobal)
खूणपताका: उलटविले
ओळ २:
'''पळस''' ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. याची पाने तळहाताएवढी रुंद व जाड राहतात. जेवण्याच्या पत्रावळीसाठी याचे पानाचा वापर होतो. उत्तर भारतात या झाडास वसंत ऋतुत (होळीच्या सुमारास) गर्द केशरी रंगाची फुले येतात, तर महाराष्ट्रात हिवाळ्यात(डिसेंबर-जानेवारी)फुले येतात. या फुलांचा पूर्वी रंग करण्यास वापर होत असे. कृत्रिम रासायनिक रंगामुळे ही पद्धत मागे पडली आहे. याच्या बिया फार कडू असतात. त्यास पळसपापडी म्हणतात. त्याचा औषधी उपयोग आहे. अक्षय्य तृतीया (वैशाख शु.३)या दिवशी याचे पत्रावळींचा वापर [[विदर्भ|विदर्भात]] जरूर होतो.
पळसाच्या झाडाला पाने तीन पानाच्या समुहातचं असतात, यावरून '''पळसाला पाने तिनचं''' ही [[म्हणी |म्हणं ]] मराठी रुढ झालेली आहे. या वनस्पतीला इंग्रजीत फ्लेम ऑफ फॉरेस्ट (Flame of the forest) असे म्हणतात, कारण पानगळीनंतर आलेल्या लाल रंगाच्या फुलांना ज्वाला सारखा आकार असतो सपुर्ण झाड पेटल्या सारखे दिसते .
 
साधारण थंडीची सुरुवात झाली की पळसाची झाड निष्पर्ण व्हायला सुरुवात होतात. हळूहळू ते बिचारं वठलेलं झाड मरून गेलं असेल असं आपण म्हणेम्हणेस्तो एकदम मळकट रंगावर लाल केशरी कडा जाणवायला सुरुवात होते नी अचानक, पळस रंगोत्सव सुरु करतो. केशरीया लालूस रंगाची नारिंगी छटेकडे झुकणारी मोठी झुपकेदार फ़ुलं अंगावर मिरवायचा झाडाचा हा पुष्पसोहोळा जवळजवळ महिना दिड महिना सुरुच रहातो. पळस, पलाश, ढाक, फ़्लेम ओफ़ फाॅरेस्ट किंवा बेन्गाल किनो अशा नावांनी ओळखलं जाणार हे मध्यम आकाराचं झाड, वनस्पतीशास्त्रात बुटिया मोनोस्पर्मा [ Butea monosperma ] या नावाने ओळखलं जातं. जॉन स्टुअर्ट या बूट काउंटीच्या उमरावाच्या[अर्ल आॅफ़ बूट] स्मरणार्थ या वृक्ष प्रजातीच नामकरण करण्यात आलं आहे. फ़ाबेसी [ Fabaceae ] ह्या कडधान्य कुळातील हा पानझडी वृक्ष, भारतातील उष्ण व समशितोष्ण जंगलांमध्ये, विंध्य, सह्याद्री व हिमालयाच्या पायथ्याचे जंगल इत्यादी ठिकाणी मुबलक प्रमाणात आढळतो. या शास्त्रिय नावातलं मोनोस्पर्मा या शब्दाचा अर्थ आहे एकच बी असलेला. पळसाच्या प्रत्येक शेंगेत एकच बी असते. या शेंगाना पळसपापडी असे म्हणतात. ह्या झाडाच्या बिया रुजायला साधारण पंधरा दिवस लागतात. वैशिष्ट्य म्हणजे, साठवायच्या म्हंटल तरी वर्षापेक्षा जुन्या बिया रुजत नाहीत.
 
साधारण पंधरा मिटर्सपर्यंत उंच वाढणारा पळस अगदी घनदाट या सदरात कधीच मोडत नाही. साधारण सहा मिटर्स व्यासात याचा पर्णसंभार पसरतो. पळसाचं झाड कधीच सरळ अथवा डेरेदार न वाढता, वेड्यावाकड्या आकारात वाढतं. याची साल तपकिरी करडट रंगाची नी तंतूमय म्हणजेच फ़ायब्रस असते. रखरखीत असलेल्या या सालीतून कधीकधी चक्क लालसर रंगाचा चिक स्त्रवतो. या लालसर चिकापासून डिंक बनवला जातो. हा डिंकाला चुनियागोंद, कसरकस म्हणतात ज्याचा वापर कातडे कमवण्यासाठी केला जातो.
 
आता ’पळसाला पाने तीन’ ही सुप्रसिद्ध म्हण ज्या पानांवरून जन्माला आलीय ती पानं कशी असतात? हा प्रश्न कुणाच्याही मनात लगेच डोकावू शकतो. ही पळसपानं मोठी, वातड जाड , एकांतरीत असतात. पानाचा देठ साधारण पंधरा सेमीपर्यंत वाढतो. या देठाला तेवढ्याच म्हणजे साधारण दहा ते पंधरा सेमी लांबीच्या तीनच पर्णिका येतात. मधली पर्णिका कायम सगळ्यात मोठीच म्हणजे दहा ते पंधरा सेमी लांब असते. बाकी दोन साधारणदहा ते पंधरा सेमी असतात. ह्या पर्णिका ठळक काळपट हिरवट असतात. वनस्पतीशास्त्रानुसार, कुठेही हा वृक्ष उगवला तरी याला तीनच पर्णिका येतात. ह्यामुळेच कदाचीत ती म्हण जन्मली असेल. ह्या पानांचा उपयोग द्रोण , पत्रावळी बनवण्यासाठी व गुरांना चारा म्हणुनही केला जातो.
 
पळसाची फ़ुलं म्हणजे ह्या झाडाचा मानबिंदूच म्हणावा लागेल. साधारण थंडीच्या अखेरीस ह्या झाडाचं फ़ुलणं सुरु होतं. पण सह्याद्रीत, कोकणात तर चक्क हे झाड कित्येकदा नोव्हेंबरातच फ़ुलायला सुरुवात करतं. लाल रंगाच्या विविध छटांमधली ही फ़ुलं काही प्रमाणात वाकडी वळलेली असतात, अगदी पोपटाच्या चोचीसारखीच. घोसात येणाऱ्या या फ़ुलांचे तुरे साधारण चाळीस सेमी लांब असतात. या फ़ुलांच्या पाकळ्या मोठ्या म्हणजे सहा सात सेमी असतात. याचा पुष्पकोष काहीसा मांसल काळपट मखमली रंगाचा असतो.या चित्ताकर्षक लाल रंगछटांच्या फ़ुलांमध्ये प्रत्येकी दहा पुंकेसर असतात ज्यातले नऊ जोडलेले असतात. फ़ुलाच्या तळाशी पाच मकरग्रंथी म्हणजेच नेक्टरीज असतात. यात तयार होणारा मधुरस प्यायला पक्षी,खारी नी भुंगे अगदी गर्दी करतात.माकडं तर फुलांच्या जोडीला या झाडाची कोवळी पानं आणि शेंगापण खातात. आपल्याकडे अनेक ठिकाणी या पळसाच्या जोडीला पिवळा पळसही फ़ुलतो. उत्तरेकडे काही ठिकाणी चक्क पांढरा पळस फ़ुलल्याची नोंद आहे.
 
 
हा [[पूर्वा फाल्गुनी]] नक्षत्राचा [[आराध्यवृक्ष]] आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/पळस" पासून हुडकले