"माधव कोंडविलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{संदर्भहीन लेख}}
 
माधव कोंडविलकर (जन्म : कोंकण, १९४१; मृत्यू : रत्नागिरी, ११ सप्टेंबर २०२०) हे एक मराठी कवी आणि लेखक होते. कोडविलकरांनी ५०हून अधिक पुस्तके लिहिली, पण त्याती फारच थोडी प्रकाशित झाली, बाकीच्यांची हस्तलिखिते प्रकाशकांकडे धूळ खात पडून राहिली. पुढे, त्यांपेकी काही त्यांची कन्यका डाॅ. ग्लोरिया खामकर हिने उजेडात आणली.
 
राजापूरच्या सोगमवाडीत प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी मुंबईत माध्यमिक शिक्षण पूर्ण केले व कोकण विभागात प्राथमिक शिक्षक म्हणून ते रुजू झाले. माधव कोडविलकरंच्या तथाकथित खालच्या जातीमुळे यांना प्रत्यक्ष जीवनात फार कटू अनुभव आले. हे अनुभव वर्तमानपत्रांतून, व ‘अस्मितादर्श’ नियतकालिकामधून प्रसिद्ध होऊ लागले. मधु मंगेश कर्णिकांच्या प्रोत्साहनाने त्यांचे लेखन १९७७ साली प्रथम ‘तन्मय’ दिवाळी अंकात प्रकाशित झाले. डायरीतल्या नोंदींसारखे हे लेखन दोन वर्षांनी ‘मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे’ या नावाने पुस्तकरूपात आले आणि एका दुर्लक्षित, उपेक्षित जीवनविश्वाचा परिचय मराठी वाचकांना झाला. पुढे हिंदी व फ्रेंच भाषेत अनुवाद झालेल्या या पुस्तकामुळे कोंडविलकर 'प्रथितयश मराठी लेखक’ झाले.