"अधिकमास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १४:
 
==प्राचीन इतिहास-वैदिक काळ==
अंधुक महिन्याचे संदर्भ वैदिक साहित्यात आढळतात. लोकमान्य टिळक यांनी ओरायन या ग्रंथात अधिक मासाबद्दल नोंदविले आहे. वैदिक आर्यानी यज्ञसंस्था विकसित केली. यज्ञातील यागांचे नियोजन त्यांनी सूर्याच्या गतीवर आधारित ठरविले होते. सौर कालगणना वेदकाळात अस्तित्वात होती आणि चंद्र कालगणना ही अस्तित्वात होती. वैदिक ऋषीनाही लक्षात आले की चांद्र आणि सौर कालगणना यांचा एकमेकांशी मेळ जुळण्यासाठी काही दिवसांचा फरक पडत होता. हे अंतर भरून काढण्यासाठी काही दिवस अधिक घ्यावे लागले. वैदिक काळातच हे अंतर भरून काढण्यासाठी दर ३ वर्षांनी कालगणनेमध्ये ३० दिवस अधिक घेतले गेले. हाच तो अधिक मास होय.<ref>{{स्रोत पुस्तक|title=भारतीय संस्कृती कोश खंड १|last=जोशी, होडारकर|first=महादेवशास्त्री, पद्मजा|publisher=भारतीय संस्कृतिकोष मंडळ|year=मार्च २०१० (पुनर्मुद्रण)|isbn=|location=पुणे|pages=१३७-१३८}}</ref>
 
==खगोलशास्त्रीय महत्त्व==
"https://mr.wikipedia.org/wiki/अधिकमास" पासून हुडकले