"अधिकमास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ४०:
 
अधिक मासात निजमासांप्रमाणेच विनायकी आणि संकष्टी या दोन्ही चतुर्थ्या असतात.
 
==कोणता अधिक मास केव्हा येतो?(अविश्वसनीय माहिती)==
* शकसंख्येतून १६६६ वजा करून येणाऱ्या उत्तराला १९ने भागावे. बाकी ३ उरल्यास चैत्र, ११ उरल्यास वैशाख, १० उरल्यास ज्येष्ठ, ८ उरल्यास आषाढ, १६ उरल्यास श्रावण, १३ किंवा ५ उरल्यास भाद्रपद आणि २ उरल्यास आश्विन महिना हा अधिकमास असतो, असे मकरंद ग्रंथात सांगितले आहे.
* काहींच्या मते :- शकसंख्येतून ९२८ वजा करून मिळालेल्या उत्तराला १६ने भागितल्यावर जर ९ बाकी उरली तर चैत्र, शून्य उरली तर वैशाख, ११ उरली तर ज्येष्ठ, ६ उरली तर आषाढ, ५ उरली तर श्रावण, १३ असेल तर भाद्रपद आणि २ उरली तर आश्विन महिना हा अधिकमास असतो.
* आणखी एक पद्धत (अधिक विश्वसनीय) :
** विक्रम संवतसंख्येत २४ मिळवून त्या बेरजेला १६०ने भागितले आणि ३०, ४९, ६८, ८७, १०६, १२५ यांच्यापैकी एखादी बाकी उरली तर चैत्र,
** ११, ७६, ९५, ११४, १३३, १५२ यांच्यापैकी एखादी बाकी उरली तर वैशाख,
** ०, ८, १९, २७, ३८, ४६, ५७, ६५, ८४, १०३, १२२, १४१, १४९ यांच्यापैकी एखादी बाकी उरली तर ज्येष्ठ,
** १६, ३५, ५४, ७३, ९२, १११, १३०, १५७ यांच्यापैकी एखादी बाकी उरल्यास आषाढ,
** ५, २४, ४६, ६२, ७०, ८१, ८२, ८९, १००, १०८, ११९, १२७, १३८, १४६ यांच्यापैकी एखादी बाकी उरल्यास श्रावण,
** १३, ३२, ५१ यांच्यापैकी एखादी बाकी उरल्यास भाद्रपद आणि,
** २, २१, ४०, ५९, ७८, ९७, १३५, १४३, १४५, १६६ यांच्यापैकी एखादी बाकी उरल्यास आश्विन मास हा अधिक मास असतो.
 
अन्य बाकी उरल्यास अधिक मास येत नाही.
 
विक्रम संवताचा अनुक्रमांक = इसवी सनाचा अनुक्रमांक + ५६ किंवा ५७ = शकसंवत्सराचा अंक + १३४ किंवा १३५.
 
शकसंवत्सराचा अंक == इसवी सनाचा अंक वजा ७८ किंवा ७९
 
==आणखी पद्धती==
"https://mr.wikipedia.org/wiki/अधिकमास" पासून हुडकले