"अधिकमास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎विविध नावे: संदर्भ घातला
ओळ २०२:
* कार्तिक : ... १९६३...
* फाल्गुन : ... १९०७-१९-१९२६-५७-१९८३...
 
=== धार्मिक महत्व ===
या मासात मंगल कार्ये, काम्य व्रते इत्यादींचा त्याग करतात. त्यामुळे या मासास इहलोकात अनेक निर्भत्सनांना सामोरे जावे लागले. त्यामुळे व्यथित होऊन तो मास वैकुंठात विष्णूकडे गाऱ्हाणे घेऊन गेला. विष्णूने त्यास गोकुळात [[श्रीकृष्ण|कृष्णाकडे]] पाठविले. तो कृष्णास शरण गेला. कृष्णाने त्या मासाचे नाव बदलून 'पुरुषोत्तम मास' असे ठेविले अशी कथा प्रचलित आहे. <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=fmtxAwAAQBAJ&newbks=0&printsec=frontcover&pg=PA393&dq=religious+importance+of+adhik+maas&hl=en|title=Hindu Dharma-A Teaching Guide|last=Kapur|first=Kamlesh|date=2013-08|publisher=Xlibris Corporation|isbn=978-1-4836-4557-5|language=en}}</ref>या मासात जे श्रद्धाभक्तियुक्त राहून उपासना, कर्मे, व्रते व दाने करतील त्यांना पुण्य मिळेल असेही त्यास वचन दिले.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=kWqPwWpkhg0C&pg=PA288&dq=importance+of+purushottam+maas&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjkr8vBhZTbAhXHo48KHQjUBqIQ6AEIJDAA|title=Yatra 2 Yatra|date=2009|publisher=Yatra2Yatra|language=en}}</ref><ref name=":0" />
 
अधिक मास हा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो. या विशिष्ट महिन्यात [[विष्णू]] देवतेच्या उपासनेला विशेष महत्व आहे. या काळात [[उज्जैन]] येथे विशेष यात्रा भरते. भागवत पुरणाचे वाचन, भागवत कथा सप्ताह, स्नान, दान, [[जप]] यांचे आचरण या महिन्यात केले जाते. ब्राह्मणांना भोजन, [[दान]] देणे यासाठीही या महिन्यात विशेष उपक्रम केले जातात.
 
अधिक महिन्यात विविध मंगल कृत्ये करू नयेत असा संकेत रूढ आहे, त्यामुळे या महिन्यात विवाह, मुंज, बारसे असे संस्कार केले जात नाहीत. तसेच नव्या वस्तूंची खरेदी अथवा नव्या कपड्यांची खरेदी अशा गोष्टी न करण्याची परंपरा समाजात रूढ आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=JFpZDwAAQBAJ&newbks=0&printsec=frontcover&pg=PT8&dq=%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95+%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8+%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF&hl=en|title=SARV VIPRA MARTAND|date=2018-05-01|publisher=VIMLESH SHARMA|language=hi}}</ref>
 
===हे सुद्धा पहा===
"https://mr.wikipedia.org/wiki/अधिकमास" पासून हुडकले