"आल्फ्रिड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: विरूध्द → विरुद्ध using AWB
ओळ १:
'''आल्फ्रिड''' (जन्म ८४९ मृत्यू ८९९) हा [[इंग्लंड|इंग्लंडचा]] पहिला राजा होता. त्याची कारकीर्द ८७१ ते ८९९ होती.
 
आल्फ्रिडच्या राजवटीपुर्वी आज [[ब्रिटन]] म्हटल्या जाणाऱ्या बेटांवर विविध [[युरोप|युरोपियन]] वंशांच्या अनेक आदिवासी टोळ्यांचे सांस्कृतिकदृष्ट्या मागासलेले राज्य होते. या टोळ्या जमीन व अन्नाकरता एकमेकांत सतत भांडत असत. नवव्या शतकात मात्र [[नॉर्वे|नॉर्वेहून]] समुद्रामार्गे आलेल्या [[व्हायकिंग]] वंशाच्या हिंस्र हल्लेखोरांमुळे ब्रिटनमधल्या या आदिवासी टोळ्यांचे अस्तित्वच धोक्यात आले. या संकटातून या टोळ्यांना व्हायकिंग लोकांच्या विरूध्दविरुद्ध एकत्र येण्याचे महत्त्व कळले व इंग्लडचे एक एकिकृत राज्य आल्फ्रिडच्या नेतृत्वाखाली उदयास आले. आल्फ्रिडने व्हायकिंग सैन्याचा पराभव केला व इंग्लड बेटावर व्हायकिंग राजवटीचे येणे टाळले. त्यानंतर आल्फ्रिडने इंग्लंडचे आरमार घडवले, अनेक किल्ले बांधून देशाची सुरक्षा बळकट केली, इंग्लंडमध्ये न्यायव्यवस्थेची स्थापना केली, व पुस्तकालये बांधून शिक्षणास प्रतिष्ठा दिली. अशा कामांमुळे इंग्रजी जनमानसात आजपर्यंत आल्फ्रिडची एक आदर्श व लोकप्रिय राजा म्हणून ओळख आहे. पुढे सातशे वर्षांनंतर पंधराव्या शतकात इंग्लंडच्या [[ट्युडर]] राजांनी आल्फ्रिडला “आल्फ्रिड दी ग्रेट” म्हणजेच “महान आल्फ्रिड” म्हणणे सुरू केले. आल्फ्रिड ॲंग्लो-सॅक्सन वंशाचा होता व तत्कालीन इंग्लंडच्या मर्यादित विस्तारामुळे त्याला [[वेसिक्स|वेसिक्सचा]] राजा असेदेखील संबोधले जाते. आल्फ्रिडने स्थापलेले वेसिक्सच्या [[ॲंग्लो-सॅक्सन]] राजवंशाचे इंग्लंडवरील राज्य मधले काही व्यत्यय वगळता १०६६ पर्यंत म्हणजे जवळजवळ दोनशे वर्षे टिकले. आल्फ्रिडच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा [[थोरला एडवर्ड]] राज्यावर आला.
 
[[वर्ग:इ.स. ८४९ मधील जन्म]]
"https://mr.wikipedia.org/wiki/आल्फ्रिड" पासून हुडकले