"विकिपीडिया:चावडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३,९३६ बाइट्सची भर घातली ,  १३ वर्षांपूर्वी
पूर्ण वगळणे शक्य?
(पूर्ण वगळणे शक्य?)
|}
[[विशेष:Contributions/192.193.221.202|192.193.221.202]] ११:५७, ८ डिसेंबर २००७ (UTC)°°[[विशेष:Contributions/192.193.221.202|192.193.221.202]] ११:५७, ८ डिसेंबर २००७ (UTC)
== पूर्ण वगळणे शक्य? ==
नमस्कार मंडळी,
 
विकिपीडिया हा मुक्तकोश असल्याने बरेच वेळा येथे निर्हेतुकपणे वा क्वचित जाणूनबूजूनही चुकीची माहिती लिहिली जाते. अर्थात संपादक या नात्याने त्या चुकांना शुद्ध करण्याची जबाबदारी आपली (व प्रबंधक या नात्याने तर थोडी अधिकच माझी व इतर सहप्रबंधकांची) आहे. ते शक्यतो साध्य देखील केले जात आहे. परंतु जुन्या सगळ्याच बदलांचा इतिहास विकिवर राहात असल्याने असे झालेले चुकीचे बदल व नंतर त्यांची झालेली शुद्धी ह्यांच्या इत्यंभूत नोंदी जतन केल्या जातात. प्रसंगी वादाच्या मुद्द्यांवर काम होताना पूर्वी चुकीच्या वाटलेल्या गोष्टी नंतर योग्य आढळ्यास पुनर्स्थापित करण्यास या सोयीची खचितच मदत होते. परंतु अशीही उदाहरणे फार आहेत, जिथे चुका या इतिहास म्हणून लक्षात ठेवण्याची सुद्धा गरज नाही एवढ्या निश्चितीने त्यांना चुकपणा स्पष्ट आहे. मग अशा वेळेस अशा तद्दन चुकीच्या संपादनांना पूर्णपणे वगळण्याची सोय आहे का, जेणे करून ना त्यांची नोंद राहावी, ना इतिहास; कारण त्यामुळे विनाकारण विकि वरील मौल्यवान जागा अडून पडते. जेवढ्या संपादनांना सांभाळत बसायची गरज नाही हे स्पष्ट आहे त्यांना पूर्ण वगळण्याची सुविधा असायला हवी; ती तशी आहे का?
 
तसेच अतिशय चुकीच्या शीर्षकांचे अप्रस्तूत लेख प्रबंधक वगळू शकतो. परंतु त्यातही मागचा इतिहास व सगळी माहिती प्रणालीवर जतन केलेली असतेच. ती पुनर्स्थापित करता येते. येथेही तोच प्रश्न उद्भवतो की, असे लेख मूळापासून वगळून जागा मोकळी करण्याची सोय आहे का? असल्यास ती कशी वापरावी; व नसल्यास विकि फाउंडेशनला ही अंतर्भूत करण्यासाठी त्यासंदर्भात सूचना द्यावी का?
 
आपल्या सार्‍यांच्या प्रतिक्रिया अपेक्षित आहेत.
 
[[सदस्य:श्रीहरि|श्रीहरि]] १२:४५, १३ डिसेंबर २००७ (UTC)
८,६५२

संपादने