छो
शुद्धलेखन using AWB
छो Pywikibot 3.0-dev |
सांगकाम्या (चर्चा | योगदान) छो शुद्धलेखन using AWB |
||
ओळ १:
'''बचत खाते''' ही बॅंका आणि इतर वित्तसंस्थांची सर्वात लोकप्रिय सेवा आहे.
विशिष्ट अपवाद वगळता कोणीही व्यक्ती किंवा व्यवसाय आपले पैसे बॅंकेला देते. हे पैसे बॅंक तिसऱ्या व्यक्तीस कर्ज म्हणून वापरावयास देते व त्यासाठी व्याज आकारते. या व्याजातील पैशातून बॅंक मूळ ठेवदारास व्याज देते. घरी रोख रक्कम ठेवण्यापेक्षा सुरक्षित रहावे म्हणूनही पैसे बचत खात्यात ठेवले जातात.
ग्राहकाने आपली ओळख पत्रे आणि पत्त्याचा पुरावा बॅंकेला अर्जासोबत देऊन बचत खाते उघडता येते. बचत खाते उघडल्यास ग्राहकाला धनादेश (चेक बुक) , ए टी एम कार्ड, नेट बॅंकिंग अशा अनेक सोयी उपलब्ध होतात. ग्राहक आपले पैसे हवे तेव्हा काढून घेऊ शकतो तसेच धनादेश , आर टी जी एस, एन इ एफ टी असे मार्ग वापरून इतरांना आपले पैसे देऊ शकतो.
ओळ १४:
==खातेपुस्तक==
बॅंकेत
खाते पुस्तक हरवले तर बॅंकेला अर्ज करून नवीन खातेपुस्तक मिळू शकते. या साठी काही शुल्क भरावे लागते. काही वेळा ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी पैसे काढताना खाते पुस्तक बरोबर असणे सक्तीचे केले जाते. गैर व्यक्तीने खात्यातील पैसे काढू नयेत या साठी हे आवश्यक आहे.
ओळ २२:
==बचत खात्यावरील व्याजाची मोजणी==
भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या नियमाप्रमाणे ग्राहकाच्या खात्यावर रोज दिवसाखेरी शिल्लक असणाऱ्या रकमेवर ठराविक दराने व्याज दिले मोजले पाहिजे. व्याजाचा दर सर्व बचत खाते ग्राहकांना समान असावा असा रिझर्व्ह बॅंकेचा दंडक आहे. जमा रकमेवरील व्याजाची रक्कम दर तीन महिने किंवा दर सहा महिन्यांनी देण्याची मुभा बॅंकांना आहे.
जर खात्यामध्ये नावे रक्कम असेल म्हणजेच खात्यामध्ये ओव्हर ड्राफ्ट असेल तर व्याजाची रक्कम दर महिनाअखेरीस वसूल करता येते. नावे रकमेवरील व्याजसुद्धा दर दिवसा अखेरीच्या नावे रक्कमेवर मोजले जाते.
[[वर्ग:
[[वर्ग:आर्थिक विकास]]
▲{{साचा:बॅंकिंग}}
|