"विज्ञानकथा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १:
'''<sub>''विज्ञानकथा हा एक वैशिष्ट्यपूर्ण वाङ्‌मय प्रकार आहे. हा ललितकथेच्याच निकषाला अनुसरून  गुंफला जातो. विज्ञानकथा ही माणसांची कथा असते. विद्यमान विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा भविष्यकाळात प्रक्षेप करून भविष्यकाळातील माणसाच्या जीवनावर त्याचा काय परिणाम होतो, त्या काळातील समाज कसा असेल, मानवी परस्परसंबंध कसे असतील याचे चित्रण करणारे साहित्य म्हणजे विज्ञानकथा.''</sub>'''
 
<u>विज्ञानसाहित्याचा उगम पाश्चिमात्य देशात झाला. इंग्रजीतली पहिली विज्ञानकथा फ्रँकेस्टाईन ही १८१८ साली मेरी शेली या लेखिकेने लिहिली. त्यानंतर बऱ्याच काळानंतर इंग्रजी साहित्यात निर्माण झालेला विज्ञानसाहित्याचा प्रवाह मराठी भाषेतही यायला सुरुवात झाली.</u>  
 
विज्ञानकथेची सुरुवात सर्वप्रथम १९०० मध्ये कृष्णाजी आठले यांच्या ज्यूल्स व्हर्नच्या कादंबरीच्या 'चंद्रलोकची सफर' या नावाने केलेल्या  अनुवादाने झाली.   त्याचे  प्रकाशन 'केरळकोकिळ' या मराठी नियतकालिकात झाले.  ते काम सहा वर्े चालू होतं. त्यानंतर  १९११ साली श्रीधर रानडे यांनी लिहिलेल्या ' तारेचे हास्य' या त्यांनी स्वतः लिहिलेल्या कथेने विज्ञानकथा लेखनाची खरी पायाभरणी झाली. [[वामन मल्हार जोशी|वा.म. जोशी]] यांनी लिहिलेल्या दोन कथा 'अप्रकाशित किरणांचा दिव्य प्रकाश ' आणि ' वामलोचना' १९१४ साली प्रकाशित झाल्या.