"विज्ञानकथा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ११:
आपल्याकडे स्वातंत्र्योत्तर काळात विज्ञान तंत्रज्ञानाला जसजसे महत्व यायला लागले तसा त्याचा प्रसारही वेगाने व्हायला लागला. विज्ञान जीवनाला सर्व अंगांनी भिडायला लागले. आणि त्यानंतर आधुनिक विज्ञानकथांचा उदयकाल १९७५ पासून झाला असे मानले जाते. 
 
[[जयंत नारळीकर]] यांच्या [[कृष्णविवर]] या कथेपासून विज्ञानकथेकडे गंभीरपणे पाहिले जायला लागलं. अर्थात, [[जयंत नारळीकर]] यांच्याआधीही  [[निरंजन घाटे]] विज्ञान कथा लेखन करत होतेच.  [[निरंजन घाटे]] १९७१पासून विज्ञान कथास्पर्धेत बक्षीसे मिळवणारे विज्ञान साहित्य लेखक आहेत. १९७५ च्या साहित्य संमेलनात [[दुर्गाबाई भागवत]] यांनी [[जयंत नारळीकर]] यांच्या विज्ञानकथांची आणि ते करत असलेल्या प्रयत्नांची दखल घेतली आणि त्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. तेव्हापासून विज्ञानकथा या प्रकाराला समीक्षकांनी गंभीरपणे घेतले. आणि मग तिची दिवसेंदिवस प्रगती होतच राहिली. त्याच काळात ललित कथांशी जवळीक साधून ललित कथांच्या निकषाला अनुसरून विज्ञान कथा  लिहायला सुरुवात केली ती विज्ञान कथा लेखक [[बाळ फोंडके]] यांनी.  विज्ञानकथा लेखन या प्रकारात [[बाळ फोंडके]] यांचे योगदान फार मोलाचे आहे.विज्ञानातल्या नव्या शोधांमुळे मानवी नातेसंबंधांचा जो विचित्र गुंता होतो याचे चित्रण त्यांच्या विज्ञानकथांमधून दिसून येते. [[लक्ष्मण लोंढे]] यांच्या नावाचा उल्लेख केल्याशिवाय विज्ञान कथाकारांची यादी अपूर्णच राहील. त्यानंतर विज्ञानकथा लेखकांत श्री. [[सुबोध जावडेकर]] यांनी लिहिलेल्या विज्ञानकथांची शैली विशेष उल्लेखनीय अशी आहे.  त्यांच्या कथेतील काल्पनिकता श्वास रोखून ठेवणारी असून कथाही उल्लेखनीय अश्या आहेत.</small><ref>{{स्रोत पुस्तक|url=http://worldcat.org/oclc/1084383140|title=Lorna Doone|last=Blackmore, R. D. (Richard Doddridge), 1825-1900.|date=[19--?]|publisher=Ryerson Press|isbn=0665265034|oclc=1084383140}}</ref> 
 
याव्यतिरिक्त [[अरुण साधू]] , अरुण हेबळेकर, अरुण मांडे, संजय ढोले , [[शुभदा गोगटे ]]यांच्या विज्ञानकथांतून त्यांनी माणसांचा वेध घेतला आहे. लेखनात तंत्रज्ञानाच्या झपाट्यात माणूसपणाच्या खुणा शोधण्याचा प्रयत्न प्रा. [[माधुरी शानबाग]] यांच्या विज्ञानकथांचा दिसून येतो. तर [[अरुण मांडे]] यांच्या विज्ञानकथेत विशेष शैली दिसते.