"पैनगंगा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
पैनगंगा नदी ही महाराष्ट्रातील [[वर्धा नदी]]ची उपनदी आहे. ही नदी [[अजिंठा]] डोंगररांगेत [[बुलढाणा]] जिल्ह्यात मढ या गावाच्या शिवारात [[बुद्नेश्र्वर]] महादेवाच्या मंदिरापासून उगम पावते. उगमानंतर ती आग्नेयकडे बुलढाणा व [[अकोला]] या जिल्ह्यांच्या दक्षिण भागातून, बुलढाणा व [[यवतमाळ]] पठारावरून पूर्वेकडे वाहत जाते. पुढे ती यवतमाळ-[[नांदेड]] या जिल्ह्यांच्या सरहद्दींवरून वाहत जाऊन यवतमाळच्या [[पूर्व]] सरहद्दीवर [[बल्लारपूर]] ([[चंद्रपूर]]) येथे वर्धा नदीस उजव्या तीराला येऊन मिळते. ही नदी [[वाशीम]] व यवतमाळ जिल्ह्यांची दक्षिण सीमा आहे. पैनगंगाची लांबी ६७६ किमी आहे. सर्व उपनद्यांसह एकूण जलवाहनक्षेत्र २३,८९८ चौ. किमी.पुढे वर्धा आणि पैनगंगा यांचा संयुक्त प्रवाह वैनगंगेला मिळतो.                        
 
पैनगंगेच्या उजव्या तीराला येऊन मिळणारी एकमेव नदी [[कयाधू]] ही आहे,तर डाव्या तीराला येऊन मिळणाऱ्या नद्यांपैकी [[पूस]], [[अडाण]], [[आरना]], [[वाघाडी]], [[खुनी]] या पैनगंगेच्या महत्त्वाच्यामुख्य उपनद्या आहेत. जलसिंचनाच्या दृष्टीने याही नदीसनदी महत्त्वउपयोगी असून, अप्पर पैनगंगा प्रकल्पानुसार या नदीवर [[इसापूर धरण]] [[नांदेड]] जिल्ह्यात [[इसापूर]]जवळ बांधले आहे. ते १९६८मध्ये बांधले. या धरणाची क्षमता ९६४ दशलक्ष घनमीटर इतकी आहे, त्यापासून शेतीस पाणीपुरवठा होतो. [[देऊळघाट]], [[वणी]], [[पुसद]], [[पांढरकवडा]], [[चिखली]], [[मेहेकर]] ही पैनगंगा नदीखोऱ्यातील महत्त्वाचीप्रमुख शहरे आहेत.  
 
पैनगंगा नदी वाशीम जिल्ह्यातील [[रिसोड]] तालुक्याच्या अगदी मध्यभागातून वाहते. [[पैनगंगा अभयारण्य]] हे यवतमाळ जिल्हा आणि नांदेड जिल्हा  यांना विभागणाऱ्या पैनगंगा नदीच्या दोन्ही बाजूंस असलेल्या संरक्षित वनास दिलेले नाव आहे. तीन बाजूंनी पाण्यानं वेढलेले एकमेव अभयारण्य आहे. पैनगंगा अभयारण्याची स्थापना १ जानेवारी १९९६ रोजी झाली. याचे क्षेत्रफळ सुमारे ३२५ चौ.कि.मी. इतके आहे. अभयारण्यात [[साग]] हा प्रमुख वृक्ष आहे. या नदीमुळे यवतमाळ जिल्ह्याला अलौकिक वनसंपदा लाभली आहे. पैनगंगा नदीच्या दुसऱ्या तीराला नांदेड जिल्हा आणि त्यातले  [[किनवट अभयारण्य]] आहे.