"झाडीबोली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ८९:
 
सुगीच्या हंगामात दिवाळीनंतर शेतातील पीक हाती आले की, येथील नाटकांना प्रारंभ होतो. झाडीपट्टी रंगभूमीवर लोककथा, लोकगीते, दशावतार, लळीत, खडीगंमत, दंडार, दंडीगान, गोंधळ, कळसूत्री बाहुल्यांचे खेळ, कीर्तनेे, भारुड, वासुदेव, तमाशे, वग, विविध नृत्यप्रकार असून, चित्र-शिल्प यासारख्या अनेक लोककलांच्या माध्यमातून लोकरंजनाचे कार्य सुरू असते. लोककलांच्या माध्यमातून झाडीपट्टी रंगभूमीवर सतत विविध प्रकारचे महोत्सव होत असतात. नाटकाचे मूळ भगीसोंग, दंडार, राधा, दंडीगान, खडीगंमत, डाहाका, कथासार गोंधळ, बैठकीचे पोवाडे यांतूनच आढळून येते. लोककलांमधूनच नाटकाची उत्क्रांती झाली आहे.असे म्हणता येईल.झाडीपट्टीत पूर्वीपासून दंडार आणि विविध लोककला सादर व्हायच्या असा उल्लेख आढळतो. इसवी सन १८८६मध्ये नागपूरला सांगलीकर नाटक मंडळी आली होती. नाटकाच्या प्रेमापोटी पुण्या-मुंबईतील नाटके पाहण्यासाठी झाडीपट्टीचे कलावंत नागपुरात जात असत. तेथील प्रयोग बघत असत. त्यांना त्यांच्या नाटकांमध्ये वेगळेपणा जाणवत होता. हा वेगळेपणा त्यांना अधिक प्रमाणात प्रेरित करीत होता. त्यामुळे येथील दंडारकर्मींनी तिथून धडे घेणे सुरू केले आणि दंडारीचे रूपांतर नाटकात होऊ लागले. झाडीपट्टी रंगभूमीवर नवरगाव येथील बालाजी पाटील बोरकर यांनी वयाच्या आठव्या वर्षी १९०९ मध्ये चिलिया बाळाची भूमिका केली होती.असे अनेक कलावंत येथे घडले.झाडीपट्टी रंगभूमीवर म्हणावे तेवढे संशोधन झालेले दिसत नाही अर्थातच काही सन्मानीय अपवाद वगळता फारसे संशोधन झालेले नाही. नवसंशोधकांसाठी हे एक नवे आव्हान आहे. यावरती संशोधन करणे आवश्यक आहे. झाडीपट्टी रंगभूमीचे योगदान एकूणच मराठी रंगभूमीला समृद्ध करण्यासाठी फार मोलाचे आहे .झाडीपट्टी रंगभूमीवरील संशोधन भावी काळातील संशोधकांसाठी उपयुक्त ठरेल असा मला विश्वास वाटतो.झाडीपट्टी रंगभूमीवर लेखन व सादरीकरण यातील वैविध्यपूर्ण आहे.
झाडीपट्टी रंगभूमीला अनेक कलावंतांनी उभे केले आहे.झाडीपट्टी रंगभूमीवर नाट्यकला रुजविण्यात कोहळी समाजाचे लक्षणीय योगदान आहे. हा कोहळी समाज जमीनदारी आणि मालगुजारी करायचा.या कलारसिकांना दंडारी पाहण्याचा छंद होता. त्यांनी स्वत:चे दंडारमंडळ आणि त्यानंतर नाट्यमंडळ गावोगावी सुरू केले.यातून झाडीपट्टी रंगभूमी बहरली.सण-उत्सवात निमित्ताने आगळ्यावेगळ्या पण वैभवशाली, गौरवसंपन्न आणि समृद्ध अशा लोक उत्सवांची रेलचेल या भागात असते. यामध्ये मंडई, शंकरपट, गळ, यात्रा यांचा समावेश आहे. विविध कला प्रकार येथे सादर केले जातात.विविध सण उत्सवांच्या आयोजनातून सामूहिकरिीत्या साकार होणारी दंडार, नाटकं, गोंधळ, तमाशा, राधा यांचा विशेषत्वाने मनोरंजनात्मक कार्यक्रमांमध्ये समावेश होतो.सर्व लोककला प्रकार झाडीपट्टी रंगभूमीवर सादर केले जातात.नाट्यसादरीकरणासाठी नेपथ्यात पडदे, सिनसिनेरी वापरतात. संगीताचे साहित्य वाद्य तयार केले. झाडीपट्टी रंगभूमीवर तीन-तीन महिने तालीम करून नाटक बसवतात. नाटय निर्माते पेटीमास्टर, दिग्दर्शकाकडून गाणी बसवून घेत असतात.
 
==झाडीबोली भाषेतील काही शब्द व त्याचे मराठीतील अर्थ==
"https://mr.wikipedia.org/wiki/झाडीबोली" पासून हुडकले