"अधिकमास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎स्पष्टीकरण: संदर्भ घातला
ओळ ५:
 
==खगोलशास्त्रीय महत्त्व==
[[पृथ्वी]]च्या सूर्याभोवतीच्या भ्रमणामुळे, [[सूर्य]] हा बारा राशींमधून प्रवास करत कालचक्राचे एक वर्ष पूर्ण करतो असे भासते, त्यास ३६५ दिवस, ५ तास ४८ मिनिटे आणि साडे ४७ सेकंद लागतात. त्या काळात इंग्रजी(ग्रेगरी) कॅलेंडरवरचे बारा महिने पूर्ण होतात. मात्र, चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्यावर आधारलेले १२ हिंदू चांद्र मास(महिने) मात्र ३५४ दिवसातच म्हणजे ११ दिवस आधीच पूर्ण होतात. [[महाराष्ट्र]], [[गुजरात]], [[आंध्रप्रदेश]] आणि [[कर्नाटक|कर्नाटका]]तील चांद्र मास हे अमान्त (अमावस्येला संपणारे) असतात. उत्तरेला ते पौर्णिमान्त असतात. ज्या हिंदू मासात सूर्य एकाही राशीचे संक्रमण करीत नाही, (रास बदलत नाही) तो '''अधिक मास''' होय. सौर मास व चांद्र मास यांची सांगड घालण्यासाठी व या अकरा दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी [[हिंदू पंचांग|पंचांगात]] अधिक मासाची व क्षय मासाची योजना करण्यात आलेली आहे. तीन वर्षांत होणारा ३३ दिवसांचा फरक [[क्षय मास]] वा अधिक मास टाकून, ही कालगणना सूर्याधारित सौर वर्षाशी जुळवून घेण्यात येते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=TAaCAAAAMAAJ&newbks=0&printsec=frontcover&dq=different+names+of+adhik+maas&q=different+names+of+adhik+maas&hl=en|title=Celebrations: Festive Days of India|last=Patil|first=Vimla|date=1994|publisher=India Book House|isbn=978-81-85028-81-1|language=en}}</ref>
 
==भारतातील प्रांतानुसार==
"https://mr.wikipedia.org/wiki/अधिकमास" पासून हुडकले