"अधिकमास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎स्पष्टीकरण: संदर्भ घातला
→‎स्पष्टीकरण: संदर्भ घातला
ओळ १०:
सूर्याधरित पंचांग पाळणाऱ्या [[आसाम]], [[ओरिसा]], [[केरळ]], [[तमिळनाडू]], [[पश्चिम बंगाल]] या राज्यांत अधिक महिना नसतो, तो फक्त चांद्र पंचांग वापरणाऱ्या [[आंध्र प्रदेश]], [[कर्नाटक]], [[गुजरात]] आणि [[मध्य प्रदेश|मध्य प्रदेशां]]सारख्या राज्यांत पाळला जातो.<ref name=":0">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=IKqOUfqt4cIC&newbks=0&printsec=frontcover&pg=PA305&dq=different+names+of+adhik+maas&hl=en|title=Traditional Festivals: A Multicultural Encyclopedia|last=Roy|first=Christian|date=2005|publisher=ABC-CLIO|isbn=978-1-57607-089-5|language=en}}</ref>
 
चैत्रापासून [[आश्विन]] महिन्यांपर्यंतचा कोणताही एक महिना अधिक मास म्हणून येऊ शकतो. कारण या महिन्यांतच सूर्याची गती मंद असते, व त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत जायला जास्त वेळ लागतो. क्वचित [[कार्तिक]] वा [[फाल्गुन]] महिन्यातही अधिक मास येतो. त्या वर्षी एकाच नावाचे दोन चांद्र महिने असतात, अगोदरचा अधिकमास आणि नंतर लगेच येणारा महिना हा निजमास. एखादा विशिष्ट महिना अधिकमास आला की १९ वर्षांनंतर तोच महिना अधिकमास म्हणून येऊ शकतो.<ref name=":1">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=mCV5YKU7TIcC&newbks=0&printsec=frontcover&pg=PA104&dq=different+names+of+adhik+maas&hl=en|title=India'S Glorious Scientific Tradition|last=Soni|first=Suresh|date=2009-01-01|publisher=Prabhat Prakashan|isbn=978-81-8430-028-4|language=en}}</ref>
 
ज्यावर्षी चैत्र हा अधिकमास असतो, त्यावर्षी अधिकमासाच्या सुरुवातीलाच शकसंवत्सराचा आकडा एकने पुढे जातो, गुढी पाडवा मात्र लगेचच नंतर येणाऱ्या निज चैत्र महिन्यात येतो. म्हणजे त्यावर्षी पाडवा हा नववर्षाचा आरंभ दिवस नसतो.
ओळ १७:
 
==स्पष्टीकरण==
चांद्र वर्ष आणि सूर्य(सायन) वर्ष यांच्यात मेळ घालण्याच्या उद्देशाने, पंचांगकर्त्यांनी कालगणनेसाठी जरी चंद्राचे भ्रमण प्रमाण मानले तरी महिन्यांची नावे मात्र सूर्याच्या भ्रमणाप्रमाणे ठेवली. <ref name=":1" />म्हणजे मीनेत सूर्य असताना जेव्हा अमावास्या येऊन संपेल तेव्हा चैत्र महिन्याला सुरुवात होईल. मेषेत सूर्य असताना आलेल्या अमावास्येनंतर वैशाख सुरू होतो, वगैरे. सूर्य एका राशीत साधारणपणे एक महिना राहतो. साधारण १४ ते १७ तारखेला तो रास बदलतो. एका अमावास्येला सूर्य ज्या राशीत असतो, त्याच्या पुढच्या राशीत तो नंतरच्या अमावास्येला असतो. मात्र साधारण तीन वर्षांनी एक अशी अवस्था येते की एका अमावास्येला सूर्य ज्या राशीत असेल त्याच राशीत तो पुढच्या अमावस्येलाही असतो. नियमाप्रमाणे सूर्य अमावास्येला ज्या राशीत असेल त्या राशीप्रमाणे त्या महिन्याला नाव दिले जाते. पण दोन लागोपाठच्या अमावास्यांना सूर्य एकाच राशीत असेल तर, म्हणजे सूर्य रासच बदलत नसेल तर तर त्या दुसऱ्या अमावास्येनंतर सुरू होणाऱ्या महिन्याला नाव काय द्यायचे? अशा वेळी नाव 'रिपीट' करण्यात येते.
 
मेषेत सूर्य असताना येणाऱ्या अमावास्येनंतर वैशाख महिना सुरु होतो हे सर्वसाधारणपणे खरे असले तरी जर त्यानंतरच्या चांद्रमासात सूर्याचे राशिसंक्रमण होत नसेल तर तो चांद्रमास वैशाख नसून अधिक वैशाख असतो. तेव्हा हे लक्षात ठेवले पाहिजे की चांद्रमासाचे नाव सूर्याच्या शुक्ल प्रतिपदेच्या स्थितीवरून नव्हे तर त्याच्या अमावास्येच्या स्थितीनुसार ठरते. जसे सूर्य मेषेत असताना जी अमावास्या येते ती चैत्र अमावास्यापासून सूर्य मीनेत असताना जी अमावास्या येते ती फाल्गुन अमावास्या. अर्थात सूर्य मीनेत असताना अधिक चैत्र अमावास्या किंवा मेषेत असताना अधिक वैशाख अमावास्या(आणि याप्रमाणे इतरही) येऊ शकतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/अधिकमास" पासून हुडकले