"झाडीबोली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ८९:
 
सुगीच्या हंगामात दिवाळीनंतर शेतातील पीक हाती आले की, येथील नाटकांना प्रारंभ होतो. झाडीपट्टी रंगभूमीवर लोककथा, लोकगीते, दशावतार, लळीत, खडीगंमत, दंडार, दंडीगान, गोंधळ, कळसूत्री बाहुल्यांचे खेळ, कीर्तनेे, भारुड, वासुदेव, तमाशे, वग, विविध नृत्यप्रकार असून, चित्र-शिल्प यासारख्या अनेक लोककलांच्या माध्यमातून लोकरंजनाचे कार्य सुरू असते. लोककलांच्या माध्यमातून झाडीपट्टी रंगभूमीवर सतत विविध प्रकारचे महोत्सव होत असतात. नाटकाचे मूळ भगीसोंग, दंडार, राधा, दंडीगान, खडीगंमत, डाहाका, कथासार गोंधळ, बैठकीचे पोवाडे यांतूनच आढळून येते. लोककलांमधूनच नाटकाची उत्क्रांती झाली आहे.असे म्हणता येईल.झाडीपट्टीत पूर्वीपासून दंडार आणि विविध लोककला सादर व्हायच्या असा उल्लेख आढळतो. इसवी सन १८८६मध्ये नागपूरला सांगलीकर नाटक मंडळी आली होती. नाटकाच्या प्रेमापोटी पुण्या-मुंबईतील नाटके पाहण्यासाठी झाडीपट्टीचे कलावंत नागपुरात जात असत. तेथील प्रयोग बघत असत. त्यांना त्यांच्या नाटकांमध्ये वेगळेपणा जाणवत होता. हा वेगळेपणा त्यांना अधिक प्रमाणात प्रेरित करीत होता. त्यामुळे येथील दंडारकर्मींनी तिथून धडे घेणे सुरू केले आणि दंडारीचे रूपांतर नाटकात होऊ लागले. झाडीपट्टी रंगभूमीवर नवरगाव येथील बालाजी पाटील बोरकर यांनी वयाच्या आठव्या वर्षी १९०९ मध्ये चिलिया बाळाची भूमिका केली होती.असे अनेक कलावंत येथे घडले.
 
==हे सुद्धा पहा==
* [[अहिराणी]]
* [[मराठी साहित्य संमेलने]]
* [[वऱ्हाडी बोलीभाषा]]
* [[झाडीपट्टी रंगभूमी]]
 
==झाडीबोली भाषेतील काही शब्द व त्याचे मराठीतील अर्थ==
"https://mr.wikipedia.org/wiki/झाडीबोली" पासून हुडकले