"मधुकर गोळवलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: मधुकर गोळवलकर हे मराठी संगीतकार आणि सारंगी वादक होते. मधुकर गो...
(काही फरक नाही)

१९:५४, ३१ ऑगस्ट २०२० ची आवृत्ती

मधुकर गोळवलकर हे मराठी संगीतकार आणि सारंगी वादक होते.

मधुकर गोळवलकर उत्कृष्ट सारंगीवादक होते. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु.ल.देशपांडे ह्यांचे ते जवळजे मित्र होते. पुलं जेव्हा त्यांच्या तरुणपणी गायनाचे कार्यक्रम करीत असत तेव्ह्या त्यांची सारंगीसाथ मधुकर गोळवलकर करावयाचे.

पुढे मधुकर गोळवलकर आकाशवाणीच्या सेवेत रुजु झाले. संगीतकार म्हणून त्यांनी केलेल्या रजनांमध्ये "स्वतंत्रतेचे स्तोत्र" ही रचना उत्कृष्ट होती. हृदयनाथ मंगेशकर ह्यांनी संगीतबद्ध केलेल्या "सागरा प्राण तळमळला" ह्या स्वातंत्र्यवीर सावरकर रचित कवितेच्या गाण्याच्या ध्वनिमुद्रिकेच्या पाठ्च्या बाजुचे गाणे "जयोस्तुते" म्हणुन हे "स्वतंत्रतेचे स्तोत्र" पुढे खूप लोकप्रिय झाले!

मधुकर गोळवलकर ह्यांनी संगीत दिलेली काही लोकप्रिय गीते

  • समाधी साधन संजीवन नाम
  • अंतरंगी तो प्रभाती
  • जयोऽस्तु ते जयोऽस्तु ते श्रीमहन्मंगले

संदर्भ स्वतंत्रतेचं स्तोत्र...