"सर्वेपल्ली राधाकृष्णन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१०,२८६ बाइट्सची भर घातली ,  ४ महिन्यांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
(वर्गात जोडले)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit
छो
स्वातंत्रोदय काळी कॅगर्स पक्षाचे नेते राधाकृष्णन ह्यांच्याकडे गेले. त्यांना संविधानसभेचे सदस्य होण्यासाठी पाचरण केले. त्यांना तत्वज्ञान मार्गदर्शनाची गरज होती. त्यांना राजकारणात रस नव्हता. संविधान सभेत येण्यापुर्वी काही वर्ष ते प्राचार्य होते. नंतर बनारस विद्यापींठाचे ते कुलगुरू होते. प्रशासन त्यांनी यशस्वीपणे सांभाळले होते.
 
''पाश्चात्त्य जगताला [[भारतीय चिद्वाद |भारतीय चिद्‌वादाचा]] तात्त्विक परिचय करून देणारा भारतावरच्या ब्रिटिश सत्ताकाळातला महत्त्वाचा विचारवंत'' म्हणून राधाकृष्णन यांना ओळखले जाते{{संदर्भ हवा}}. भारतीय तत्त्वज्ञानाचे भाष्यकार म्हणून ते ऑक्सफर्डमध्ये नावाजले गेले. त्यांच्या कार्याचे महत्त्व जाणून ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांच्या नावाने 'राधाकृष्णन मेमोरियल बिक्वेस्ट' हा पुरस्कार ठेवला आहे.<ref>http://www.orinst.ox.ac.uk/administration/trust_funds/radhakrishnan_memorial_bequest.html</ref>.
[[चित्र:Bharatratn-sarvepalli-radhakrishnan-marathi.jpg|इवलेसे|https://allbestthoughts.com/bharatratna-dr-sarvepalli-radhakrishnan/]]
राधाकृष्णन यांच्या जीवनात तीन प्रमुख प्रश्न होते. पहिला प्रश्न असा की, नीतिमान पण चिकित्सक, विज्ञानोन्मुख पण अध्यात्मप्रवण असा नवा माणूस कसा निर्माण करता येईल? या दृष्टीने शिक्षणाचा काही उपयोग होऊ शकेल का? दुसरा प्रश्न असा होता की, प्राचीन भारतीय तत्त्वचिंतन सर्व जगाला आधुनिक भाषाशैलीत, आधुनिक पद्धतीने कसे समजावून सांगता येईल? भारतीय तत्त्वचिंतनाचे वैभव जगाला नेमकेपणाने कसे सांगावे? कसे पटवून द्यावे? तिसरा प्रश्न असा होता की; मानव जातीचे भवितव्य घडवण्यासाठी सांस्कृतिक संचिताचा उपयोग किती?' कुणाशीही ते याच तीन प्रश्नांच्या अनुरोधाने बोलत, असे नरहर कुरुंदकर लिहितात.<ref>[[नरहर कुरुंदकर]]व्यक्तिवेध</ref>
 
=== '''सुरुवातीचे जीवन==''' =
==जीवनचारित्र्य==
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी मद्रास प्रेसिडेन्सी मधील चित्तोर जिल्ह्यातील तिरुत्तनी या ठिकाणी झाला. मद्रास ख्रिचन कॉलेज मधून त्यांनी पदवीचे शिक्षण घेऊन त्याच कॉलेज मधून पदवीत्तर शिक्षण घेतले.
===सुरुवातीचे जीवन===
 
सर्वेपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म मद्रास मध्ये झाला.ते तेलुगु भाषा बोलायचे.
= '''शैक्षणिक कारकीर्द''' =
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीस सहाय्यक प्राध्यापक आणि नंतर प्राध्यापक म्हणून अनुक्रमे मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेज आणि म्हैसूर विद्यापीठामध्ये १९१८ - १९२१ दरम्यान काम केले. म्हैसूर विद्यापीठाने राधाकृष्णन यांचा तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून गौरव केला.
 
१९२१ - १९३१ या दरम्यान कोलकत्ता विद्यापीठाने त्यांना तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून नियुक्त केले.
 
राधाकृष्णन १९३१ - १९३६ मध्ये आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू झाले. १९३९ मध्ये पंडित मदन मोहन मालविययांच्या विनंतीवरून त्यांनी बनारस विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून सूत्र हाती घेतले. ते १९४८ पर्यंत बनारस विद्यापीठाचे कुलगुरू राहिले.
 
कोलकत्ता विद्यापीठ आणि बनारस विद्यापीठ या दोन्ही विद्यापीठात काम पाहत असताना डॉ. राधाकृष्णन यांनी प्राध्यापक पदाचा त्याग केला नाही. कोलकत्ता विद्यापीठातील आठवडाभराचे अध्यापनाचे दिवस सांभाळून शनिवार आणि रविवार हे दोन दिवस ते बनारस विद्यापीठाचेही प्रशासकीय कारभार पाहत असत.
 
ऑक्सफर्ड विद्यापीठात दरवर्षातून काही महिने अशाप्रकारे २० वर्षे त्यांनी अध्यापनाचे कार्य केले. राधाकृष्णन यांच्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठात (१९३६ - १९५२) विद्यासन निर्माण केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://allbestthoughts.com/bharatratna-dr-sarvepalli-radhakrishnan/|title=भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन|last=Kalkhaire|first=Mayur|date=2020-08-29|website=All Best Thoughts|language=en-US|access-date=2020-08-30}}</ref>
 
= '''राजकीय कारकीर्द''' =
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी शैक्षणिक कारकिर्दी मध्ये यश मिळवल्यानंतर त्यांची राजकीय कारकीर्द सुरु झाली. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते. ते १३ मे १९५२ - १२ मे १९६२ पर्यंत उपराष्ट्रपती राहिले. भारताने १९५४ साली त्यांना 'भारतरत्न' हा किताब देऊन त्यांना गौरविले.
 
त्याचप्रमाणे ते स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती (१३ मे १९६२ - १३ मे १९६७) होते.
 
= '''शिक्षक दिन''' =
भारतरत्न, माजी राष्ट्रपती आणि शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन म्हणून साजरी केली जाते. शिक्षणाबद्दल डॉ. राधाकृष्णन यांना अतिशय जिव्हाळा होता. शिक्षण क्षेत्रात अधिकाधिक विकास घडून यावा यासाठी ते आयुष्यभर प्रयत्नशील होते.
 
चांगल्या शिक्षकांचा सन्मान हा संस्कृतीचा, सत्याचा व ज्ञानाचा सन्मान आहे. समाजाचा विकास सत्तेने होत नाही, यंत्राने होत नाही तर तो आदर्श शिक्षकांमुळे होत असतो. शिक्षकांचे महत्त्व असाधरण आहे हे जाणल्याशिवाय आपली तांत्रिक व यांत्रिक प्रगती होणार नाही.
 
ज्या देशामध्ये शिक्षकाला सर्वत्र मान व प्रतिष्टा असते तेथील प्रज्ञावंत माणसे शिक्षण क्षेत्रातच अधिकाधिक आढळून येतात. असे देश सर्वांगीण प्रगती करू शकतात. समाजाला सुसंस्कृत करणारा शिक्षक हा देशाचा आधार आणि दिलासा आहे. त्यामुळे नागरिकांनी या पवित्र व्यवसायाचा सन्मान केला पाहिजे.
 
एक कुलगुरू हा गुरुकुलाचा आद्य आचार्य असावयास हवा. ज्ञानाने, तापाने, चारित्राने तो सगळ्यांच्या अग्रस्थानी असावा. हे वाक्य कुलगुरू, प्राध्यापक, आणि एक शिक्षक म्हणून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना पूर्णतः लागू होते. एक शिक्षक शिष्याला ज्ञान देताना परिपूर्ण असावा असे त्यांचे मत होते. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी अनेक विषयांचा अभ्यास केला होता.
 
संस्कृत भाषेचा अभ्यास करून त्यांनी प्रस्थानत्रयी आणि समग्र भाष्यग्रंथ अभ्यासले. पश्चिमेकडचे तत्त्वज्ञानातील प्लेटो, प्लॉटनिस, कान्ट, ब्रॅडले यांच्यासारख्या तत्त्वज्ञांच्या ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केला. त्याचप्रमाणे इंग्रजी साहित्यातील शेक्सपिअर, कोलारीज, ब्राउनिंग, वॊल्ट विटमन इत्यादी साहित्यिकांच्या लेखन शैलीचा त्यांनी अभ्यास केला. तसेच गटे, डानटे, होमर यांसारख्या महाकवींची काव्यसृष्टी अनुभवली. त्यामुळे एक परिपूर्ण शिक्षक म्हणून संपूर्ण जगाने डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा गौरव केला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://allbestthoughts.com/bharatratna-dr-sarvepalli-radhakrishnan/|title=भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन|last=Kalkhaire|first=Mayur|date=2020-08-29|website=All Best Thoughts|language=en-US|access-date=2020-08-30}}</ref>
 
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे स्वतः एक उत्तम शिक्षक असल्यामुळे त्या पेशाबद्दल वाटणारे प्रेम आणि त्यासाठी केलेले ४० वर्षांचे कार्य यांचा सन्मान करण्यासाठी भारत सरकारने ५ सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस 'शिक्षकदिन' म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले.
 
==पुरस्कार==
 
== संदर्भ आणि नोंदी ==
 
{{संदर्भयादी}}
# ^[[नरहर कुरुंदकर]]
# ^https://allbestthoughts.com/bharatratna-dr-sarvepalli-radhakrishnan/
# ^https://allbestthoughts.com/bharatratna-dr-sarvepalli-radhakrishnan/
# ^http://www.uramamurthy.com/srk_phil.html
 
{{क्रम
२०

संपादने