"भारताचा ध्वज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१०९ बाइट्सची भर घातली ,  ८ महिन्यांपूर्वी
भर घातली
(भर घातली)
(भर घातली)
भारताचा राष्ट्रीय ध्वज हा [[भगवा]] (केशरी ), पांढरा आणि हिरवा असा क्षैतिज आयताकृती तिरंगा आहे.त्याच बरोबर अशोका चक्र, त्याच्या मध्यभागी आहे. '''भारतीय राष्ट्रध्वज''' ('''तिरंगा''') २२ जुलै १९४७ रोजी, [[भारत]] देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या २४ दिवस आधी अंगीकारला गेला. २४ मार्च रोजी इंंग्रजांनी लवकरच भारत सोडून जाण्याचा आपला निर्णय जाहीर केला. स्वतंंत्र भारताचा ध्वज कसा असावा हे ठरविण्यासाठी तातडीने एक समिती नेमली गेली. त्यात [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] प्रभृृती होते. त्यांनी ठरवले की कॉंग्रेसचा ध्वज हाच स्वतंंत्र भारताचा ध्वज म्हणून घोषित करावा, फक्त चरख्याऐवजी [[अशोकचक्र]] हे चिह्न ध्वजाच्या मध्यभागी विराजमान व्हावे. घटना समितीने २२ जुलैला या ठरावाला मंंजुरी दिली.<ref>फिरोदिया अरूण, भुवन मनमोहिनी,स्नेहवर्धन प्रकाशन,पृृ.७५</ref>आणि १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताच्या अधिपत्याखालील अधिकृत ध्वज झाले.त्यानंतर भारतीय ध्वज म्हणून ध्वज कायम ठेवण्यात आला.
 
कायद्याने,हा ध्वज खादीपासून बनवावा आणि खास प्रकारचे हात सूत कापडाचा किंवा रेशीमचा असावा.यासाठी महात्मा गांधी यांनी लोकप्रिय केलेली खादी वापरली जाते.ध्वज निर्मितीची प्रक्रिया व वैशिष्ट्ये भारतीय मानक कार्यालयद्वारे ठरवली जाते. हा ध्वज तयार करण्याचा अधिकार खादी विकास व ग्रामोद्योग आयोगाकडे आहे.तो अधिकार विभागीय गटांना वाटून दिला जातो.
 
== रचना ==
२,४०४

संपादने