"इंग्लंड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५५:
 
=== मध्ययुगीन ===
रोमन साम्राज्याच्या पतनानंतर इंग्लंडमध्ये ब्रिटिश बेटांच्या दक्षिण भागात वास्तव्यास असलेल्या ॲंग्लो सॅक्सनी टोळ्यांची राज्ये चालू झाली. साधारणपणे ५ शतकापासून अनेक लहान मोठी [[ॲंग्लो सॅक्सन]] राज्ये अस्तित्वात होती. या काळातील [[आर्थर]] राजाच्या कहाण्या प्रसिद्ध आहेत. इंग्लंडचे युरोपबरोबरच [[ख्रिस्तीकरण]] झाले. [[इ.स. ५००]] मध्ये इंग्लंडमध्ये [[केंट]],[[इसेक्स]], [[ससेक्स]] इत्यादी ७ लहान राज्ये अस्तित्वात होती. या राज्यांची एकमेकात भांडणे होत व एकमेकांवर चढाओढी चालत. १० व्या शतकात [[वेसेक्स]] राज्याने संपूर्ण इंग्लंडवर नियंत्रण मिळवले व एका सार्वभौम इंग्लंडची स्थापना [[इ.स. ९२७]] मध्ये झाली. [[इ.स. १०१६]] मध्ये [[डेन्मार्क]] चा राजा [[कनुटे]] याने इंग्लंडवर कब्जा मिळवला व थोड्या काळाकरिता तो इंग्लंडचा राज्याधिकारी बनला.
 
१० व्या शतकात इंग्लंड हा तत्कालीन देश युरोपमधील इतर देशांपेक्षा आर्थिकदृष्ट्या बराच मागसलेला होता. साधनसामुग्रीची तसेच सुपीक प्रदेशाची कमतरता हे मागासण्याचे कारण होते. शेजारील [[फ्रान्स]] हा त्यामानाने खूपच सधन देश होता. इंग्लंडने या काळातच आक्रमक साम्राज्यवादी धोरण स्वीकारले. फ्रान्स बरोबरील अनेक युद्धात साधन सामुग्रीची कमतरता असूनही अनेक युद्धात फ्रान्सचा पाडाव केला व फ्रान्समधील बराच भाग व्यापला. याला [[इंग्लंड फ्रान्स शतकी युद्ध]] असे म्हणतात. [[रिचर्ड]]च्या नेतृत्वाखाली इंग्लंडने [[क्रुसेड]]मध्ये(धर्मयुध्दात) हिरीरीने सहभाग घेतला. क्रुसेडमध्ये वापरलेला ध्वज इंग्लंडचा अधिकृत ध्वज बनला. याच काळात इंग्लंड एक प्रबळ लष्करी देश म्हणून उदयास आला. अल्फ्रेडने इंग्लंडच्या भविष्यातील अत्यंत प्रबळ नौदलाची पायाभरणी केली. मध्ययुगात इंग्लंडचे [[तिरंदाज]] (Longbows) व [[नाईट्स]] (Knights)([[सरदार]]) यांची संपूर्ण युरोपभर प्रबळ योद्धे म्हणून ख्याती होती.
"https://mr.wikipedia.org/wiki/इंग्लंड" पासून हुडकले