"शिवनेरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५५:
 
12)सन 1765 मध्ये महादेव कोळ्यांनी दुसरे बंड केले. या बंडाचे नेतृत्व जुन्नरच्या मावळतील देशमुख/नाईक संताजी शेळकंदे यांनी केले. या मध्ये त्यांनी शिवनेरीचा ताबा घेतला. हे बंड मोडून काढण्यासाठी पुण्याहून बारभाईंनी आणि सवाई माधवरावांनी उधो विश्वेश्वरच्या मदतीला गारद्यांना पाठवले.पुढे बंड मोडून काढले आणि महादेव कोळी सरदारांना शिक्षा करण्यात आली. संताजी मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले. वारंवारं होणाऱ्या बंडामुळे पेशवे हैराण झाले. पुढे सन 1771 मध्ये नाना फडणीसांनी संताजी बरोबर तह केला आणि त्यांना सरदारकी बहाल केली आणि शिवनेरीवर पुन्हा कोळ्यांना सेवेत रुजू केले.
 
13) पेशवे काळात शिवनेरीचा उपयोग कैद्यांसाठी केला जात होता. शिवनेरी किल्ल्यावरील कैद्यांना काही आनंदाच्या प्रसंगी सोडूनदेखील देण्यात येत होते.18 एप्रिल 1774 रोजी सवाई माधवराव यांचा जन्म झाला. या आनंदाप्रीत्यार्थ बारभाई मंडळाने शिवनेरी आणि नारायणगड
यांवरील कैद्यांना सोडून देण्यात आले होते.अशी नोंद आहे
काळाच्या ओघात शिवनेरीवरील कैदखानाची पडझड होऊन गेली.
 
14) सन 1818 मध्ये मेजर एल्ड्रिजनने शिवनेरी किल्ल्याला वेढा घातला. किल्लेदाराने काही काळ किल्ला लढवला. नंतर त्याने किल्ला सोडून हडसर च्या किल्ल्याचा किल्लेदाराकडे आश्रय घेतला अशी इतिहासात नोंद आहे.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/शिवनेरी" पासून हुडकले