"सरस्वती नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १८:
भारताच्या पुरातत्व सर्वेक्षण विभागातर्फे [[हरियाणा|हरियाना]]तल्या यमुनानगर जिल्ह्यातल्या आदी-बद्रीपासून ते [[गुजरात]]मधल्या [[कच्छ]] जिल्ह्यातल्या खिरसरापर्यंतच्या विस्तीर्ण प्रदेशात उत्खनन करण्यात आलं असून, घग्गरच्या प्राचीन प्रवाहाचा (Palaeo channel ) शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=TyIqAQAAMAAJ&q=%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80+%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80+%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7&dq=%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80+%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80+%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjtxqih8NnjAhWEdn0KHWirDHAQ6AEIRzAE|title=Āditīrthaṅkara R̥shabhadeva: jīvanavr̥tta, svarupa, evaṃ Śiva ke sātha tādātmya|last=Jaina|first=Dharmacandra|last2=Śukla|first2=Saṅkaṭāprasāda|date=2007|publisher=Sarasvatī Nadī Śodha Saṃsthāna, Hariyāṇā|language=hi}}</ref> सन २००२ ते २००४ आणि सन २००९ ते २०१४ या काळात पुरातत्व विभागातर्फे हरियानातल्या आदी-बद्री, [[कुरुक्षेत्र]], [[फतेहाबाद]], [[हिस्सार]], राजस्थानातल्या [[गंगानगर]], हनुमानगड, करणपुरा आणि गुजरातमधल्या खिरसारा, आणि कच्छ या ठिकाणी स्वतंत्रपणे उत्खनन करण्यात आलं.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=vq1jAAAAMAAJ&q=%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80+%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80+%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7&dq=%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80+%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80+%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiW_JjR89njAhXLaN4KHdMDBqE4ChDoAQg_MAM|title=Rājasthānī sāhitya kā ādikāla|last=Mālī|first=Bī Ela|date=1991|publisher=Rājasthānī Bhāshā Bāla Sāhitya Prakāśana Ṭrasṭa|language=hi}}</ref> सरस्वती नदी नक्कीच अस्तित्वात असावी, असं सिद्ध करणारे पुरावे या उत्खननातून आढळून आले आहेत.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=8yc7-OirxKEC&printsec=frontcover&dq=sarasvati+river&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjqrqvV_NnjAhXGpo8KHahrCN4Q6AEIMjAC#v=onepage&q=sarasvati%20river&f=false|title=The Lost River: On the Trail of the Sarasvatī|last=Danino|first=Michel|date=2010|publisher=Penguin Books India|isbn=9780143068648|language=en}}</ref>
प्रख्यात शास्त्रज्ञ के. एस. वालदिया यांच्या म्हणण्यानुसार, सरस्वतीला पूर्वेकडं आणि पश्‍चिमेकडं अशा दोन उपनद्या असाव्यात आणि ही नदी हरियाना, [[राजस्थान]] व उत्तर गुजरातमधून वाहत असावी. [[जैसलमेर]]च्या आजूबाजूला संशोधन करताना तिथल्या स्थानिकांकडून कळलं, की रानाऊ या जवळच्या गावात कधीही पाण्याची कमतरता भासत नाही. एवढंच नव्हे तर, तिथं खोदण्यात आलेल्या कूपनलिकेतून नेहमीच गोड पाणी मिळतं. बाकीच्या गावांमध्ये मिळतं तसं खारट पाणी इथं मिळत नाही. इथल्या गावकऱ्यांच्या धारणेनुसार, ‘या गावांखालून सरस्वती नदीच्या पाण्याचा प्रवाह वाहतोय’! रानाऊपासून साधारणपणे २२ किलोमीटर दूर असलेल्या; पण रानाऊच्याच रेषेत असलेल्या घंटियाली आणि टनोट या गावांतही हीच परिस्थिती आहे.
सरस्वतीचा उगम [[उत्तराखंड]]मधल्या बंदरपूंछ या [[गढवाल]]-हिमालयातल्या [[शिवालिक पर्वतरांगां]] पर्वतरांगांमधल्यामधल्या हिमनदीतून झाला असावा. ‘ग्राउंड पेनिट्रेटिंग रडार’चा वापर करून घग्गर नदीपात्रातल्या लुप्त प्रवाहाचा मार्ग निश्‍चित करण्याचा प्रयत्नही आता सुरू झाला आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) संशोधनानुसार, ‘सरस्वतीच्या प्राचीन प्रवाहरेषेवरून आज घग्गर नदी वाहते आणि तोच खरा प्राचीन सरस्वती नदीचा मार्ग आहे.’ या नदीच्या आजूबाजूच्या एकूण १४ विहिरींमधल्या पाण्याच्या ‘कार्बन डेटिंग’ पद्धतीनं केलेल्या कालनिर्णयानुसार, हे पाणी आठ हजार ते १४ हजार वर्षं जुनं असावं. इथली पाण्याची प्रतही खूप चांगली आहे. या प्रवाहमार्गाच्या नजीक असलेल्या वनस्पतीही वर्षभर आणि तीव्र उन्हाळ्यातही टिकून राहत असल्याचं आढळून आलं आहे. नदीकाठची गावं गेली ४० वर्षं या विहिरींचं पाणी वापरत आहेत. असं असूनही एकदासुद्धा पाण्याची कमतरता जाणवली नाही, असं गावकरी सांगतात.
उपग्रह-प्रतिमांचा अभ्यास आणि प्रदेशाला देण्यात आलेल्या प्रत्यक्ष भेटींवरून, या भागातल्या सरस्वती नदीच्या परित्यक्त (Abandoned) प्रवाहाच्या अस्तित्वाचा अंदाज येऊ शकतो. रैनी आणि वहिंदा या नद्या सरस्वती नदीत समाविष्ट होण्यापूर्वीपासूनच अस्तित्वात असाव्यात आणि त्यांनी नदीखोऱ्यात भरपूर गाळसंचयन केलं असावं, असेही या अभ्यासातून सूचित होत आहे. [[पंजाब]], हरियाना आणि उत्तर राजस्थानातून वाहत सरस्वती नदीचा प्रवाह खंभातच्या आखातात समुद्राला जाऊन मिळत असावा. राजस्थानमधे प्रवाह कोरडा होऊन पुढं हनुमानगड, पिलिबंगन, अनुपगडच्या दिशेनं जात असावा. भूशास्त्रज्ञांना या खोऱ्यातल्या प्रचंड गाळसंचयनाबद्दल आणि दरवर्षी १५ सेंटिमीटरपेक्षाही कमी पाऊस पडणाऱ्या [[थर]] वाळवंटाच्या पश्‍चिम भागात आढळणारी पाण्याची विपुलता याबद्दल नेहमीच उत्सुकता लागून राहिली आहे.
सरस्वती नदीचा नेमका मार्ग सापडणं कठीण झाल्यामुळं आणि तिच्या अस्तित्वाबद्दल अजूनही ठोस पुरावे न सापडल्यामुळं ‘सरस्वती नदी ही एक कपोलकल्पित गोष्ट असावी,’ असं अनेकांना अजूनही वाटतं. गेली दोन दशकं या नदीचं अस्तित्व सिद्ध करण्यात गेली आहेत. [[जोधपूर]]च्या ‘केंद्रीय रुक्ष प्रदेश संशोधन संस्थे’नं भरपूर आणि नेमकं संशोधन करून ‘सरस्वती नदी अस्तित्वात होती’ असं मत मांडलं आहे. उपग्रह-प्रतिमांच्या अभ्यासातूनही काही गोष्टींचा उलगडा होऊ शकला आहे. नदीमार्गातल्या ‘क्षत्रना’च्या ईशान्येला सरस्वतीचा एक प्रवाह ‘मार्कंडा नदी’ म्हणून वाहत असावा. आजची छाऊतांग नदी आणि तिचा सुरतगडजवळ घग्गर नदीशी होणारा संगम यावरूनही जुन्या, कोरड्या पडलेल्या प्रवाहाची कल्पना येऊ शकते. उपग्रह-प्रतिमांवरून असाही तर्क करता येतो, की जुन्या घग्गर नदीचे अनुपगडजवळ दोन प्रवाह झाले असावेत. त्यातला एक मारोटजवळ व दुसरा बैरिनाजवळ लुप्त झाला असावा. म्हणजेच प्राचीन नदी इतकी रुंद असावी.