"इब्राहिम अल्काझी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ५:
लंडनहून परतल्यावर इब्राहिम अल्काझींनी त्यांनी इ.स.१९५४मध्ये मुंबईत ’थिएटर युनिट’ नावाची संस्था स्थापन केली, आणि इथे त्यांच्या नाट्यक्षेत्रातील कामगिरीला सुरुवात झाली. या संस्थेच्या वतीने त्यांनी अनेक हिंदी आणि इंग्रजी नाटकांचे रंगभूमीवर प्रयोग केले.
 
पुढे, इब्राहिम अल्काझी हे दिल्लीत इसवी सन १९५९मध्ये स्थापन झालेल्या [[राष्ट्रीय नाट्य विद्यालय]]ाचे ([[नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा]])चे (एन्‌एस्‌डीचे) पहिले संचालक झाले. या नाट्यशाळेत त्यांनी तीन वर्षाचा एक नाट्य पदविका अभ्यासक्रम तयार केला. तो शिकवीत असताना त्यांनी विद्यार्थ्यांकडून संस्कृत आणि भारतीय भाषांतील उत्तमोत्तम नाटके हिंदीत रूपांतरित करून घेतली आणि त्यांचे प्रयोग केले. इ.स.१९६२ते १९७७ या त्यांच्या नाट्यशाळेमधील कारकिर्दीत, त्यांनी रंगमंचावर नाट्यप्रयोग कराणाऱ्या नाट्य विद्यालयातील विद्यार्थ्यांची एक शाखा(Repertory) संस्थापित केली. भारतीय नाटकांबरोबरच इब्राहिम अल्काझींनी ग्रीक शोकांतिका, ऑस्बर्न, इब्सेन, चेकॉव्ह, बेकेट, ब्रेशश्ट, मोलियर, स्ट्रिंगबर्ग यांची नाटके, आणि शेक्सपियरची मुख्य नाटके विद्यार्थ्यांकडून बसवून घेऊन, दिल्लीत त्यांचे रंगमंचीय प्रयोग केले. इब्राहिम काझींमुळे दिल्लीत जपानी ’काबुक”या नाट्यप्रकाराचेही प्रयोग झाले. अशा प्रकारे, अल्काझींनी भारतात राष्ट्रीय नाट्याची संकल्पना अमलात आणली आणि पुढे रुजवलीही. उत्तम मार्गदर्शक, दिग्दर्शक आणि नेपथ्यकार म्हणून अल्काझी जगभर नावाजले गेले आहेत.
 
दिल्लीत खुल्या रंगमंचावर नाट्यप्रयोग करण्याची सुरुवात इब्राहिम अल्काझींनी केली. पुराना किल्ला आणि असेच खुले पटांगण असलेल्या ऐतिहासिक व अन्य इमारतींत अल्काझींचे नाट्यप्रयोग होत असत. अशा प्रकारे झालेल्या नाटकांमध्ये ‘तुघलक’ व ‘अंधायुग’ या नाटकांचे प्रयोग कायमस्वरूपी लक्षात राहणारे ठरले.