"धुळे जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३ बाइट्स वगळले ,  १ महिन्यापूर्वी
बदलांचा आढावा नाही
(नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले)
 
|वर्षाव = 544
}}
'''धुळे जिल्हा''' हा उत्तर महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा मानला जातो. धुळे जिल्हा हा इथल्या शुद्ध दुधाकरीता सर्वत्र प्रसिद्ध आहे. असे म्हणतात की, कधी काळी, दिल्ली मधीलदिल्लीमधील ग्राहक धुळ्याच्या दुधाकरीता वाट पाहत असत.धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा हे महाराष्ट्रातील एकमेव शहर आहे की जिथे, मक्यापासून ग्लुकोज साखर आणि अन्य पदार्थ बनवले जातात. लळिंगचा किल्ला, शिरपुरचे बालाजीचे मंदीर, [[नकाणे तलाव]], राजवाडे संशोधन मंडळ हि धुळे जिल्ह्यातील काही पर्यटनाची स्थळे आहेत. धुळे जिल्हा कापूस, मिरची, [[ज्वारी]], [[ऊस]] ह्यांच्या उत्पादनाकरीता सर्वत्र प्रसिद्ध आहे.तापी नदी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे परंतु ती केवळ पावसाळ्यातच खळाळत वाहते.
 
धुळे जिल्ह्यात चार तालुके आहेत- [[धुळे तालुका|धुळे]], [[शिरपूर]], [[साक्री]] व [[शिंदखेडा]]. <br />
 
== शेती ==
पाण्याच्या अभावामुळे धुळे जिल्ह्यात मोठया प्रमाणावर कोरडवाहू शेती केली जाते. बागायती शेतीचे प्रमाण फक्त १८१३ हेक्टरपुरतं मर्यादित आहे. शासनाच्या ११ मध्यमवर्गीय जलसिंचन प्रकल्पामुळे ५१,५९७ हेक्टर जमीन जलसिंचनाखाली आली आहे. अनेक गावात जिल्ह्यातील प्रमुख नद्यांमधून तसेच पांझरा कान नदीवरील अक्कलपाडा धरणामधून शेतीला पाणी पुरवठा केला जातो. प्रमुख पिके- [[ज्वारी]], बाजरी, हरभरा, तूर, मूग, उडीद, कापूस, मिरची, [[गहू]], [[ऊस]]
 
जिल्ह्यात २ मोठे उद्योग आहेत तर ९ मध्यम उद्योग व १३२ लघुद्योग संस्था आहेत.
४,१२०

संपादने