"श्रीवर्धन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
→‎धार्मिक स्थळे: माहिती दिली
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ३३:
 
== धार्मिक स्थळे ==
सोमजाई देवीचेमाता मंदिर :
हे प्रसिद्ध मंदिर म्हणजे श्रीवर्धनचे मुख्य मंदिर असुन श्रीवर्धनची ग्रामदेवता देवी सोमजाई हिचे मंदिर होय.
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी वसलेले हे मंदिर प्राचीन आहे.देवीची सुंदर मुर्ती हि प्राचीन कलाकुसरेचे उत्तम उदाहरण आहे.देवीचे मुख्य मंदिर,मोठी ओसरी व मंदिरा बाहेरचे पटांगण असा विस्तार आहे.श्रीवर्धन मधील सर्व मुख्य सण,रथसप्तमीची रथयात्रा,दहिहंडी, नवरात्र,होळी हे या मंदिर परिसरात उत्साहाने साजरे केले जातात.इथले वैशिष्ट्य असे कि मोरपिसांच्या गुच्छाने भाविकांना देवीच्या अंगारा भाविकांच्या अंगावर लावला जातो,त्यामुळे वाईट शक्ती निघुन जातात अशी श्रद्धा आहे.
 
श्री. लक्ष्मीनारायण मंदिर :
 
श्रीवर्धनमधील श्री लक्ष्मीनारायण मंदिर प्रसिद्ध आहे. शिल्पकलेचा अप्रतिम नमुना असलेली विष्णुमूर्ती आवर्जून पाहावी अशी आहे. सुमारे दोन फूट उंचीची काळ्या पाषाणाची ही मूर्ती दक्षिण भारतीय शैलीची असून शिलाहार काळातील असावी. दगडाच्या झिलईमुळे ती चकचकीत दिसते. अतिशय रेखीव प्रमाणबद्ध असलेल्या या मूर्तीच्या उजव्या पायाशी विष्णुवाहन गरुड व डाव्या पायाशी लक्ष्मी आहे. या शिवाय जय-विजयही दोन्ही बाजूंस उभे आहेत. प्रभावळीवर कीर्तिमुखाच्या दोन्ही बाजूंस दशावतार कोरलेले आहेत. विष्णुमूर्तीच्या हातातील आयुधांच्या क्रमानुसार (पद्म, चक्र, गदा, शंख) ही मूर्ती श्रीधराची ठरते. परंतु सोबत लक्ष्मी असल्यामुळे कदाचित लक्ष्मीनारायण संबोधले जात असावे. गळ्यातील दागिन्यांचे नक्षीकाम, मुकुट व प्रभावळीचे नक्षीकाम, आयुधांचे कोरीवकाम म्हणजे बारीक कलाकुसरीचा आदर्श नमुना आहे.
सभामंडपात प्रवेशद्वाराकडून दुसऱ्या चौकोनी वाश्यावर एक काष्ठलेख नजरेस पडतो. देवनागरी लिपीतील हा मजकूर आपल्याला सहज वाचता येतो. यावरून २९ मार्च १७७५ या दिवशी मंदिराचा जीर्णोद्धार झाला हे समजते. मंदिराच्या पाठीमागच्या भिंतीवर आजही पेशवे घराण्यातील रोजच्या प्रार्थनेत म्हटला जाणारा श्र्लोक आहे. मंदिराच्यासमोरच छोट्या घुमटीत गरुडमूर्ती आहे तर शेजारी मारुती मंदिर आहे.
 
सोमजाई देवीचे मंदिर :
 
== कसे जाल श्रीवर्धन परिसरात? ==