"अँड्रिया कॉर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
माहिती लिहिली.
ओळ १:
'''अॅंड्रीया जेन कॉर ('''एमबीई) (जन्म १७ मे १९७४) ह्या एक आयरीश संगीतकार, गीतकार, गायिका आणि अभिनेत्री आहेत. त्या ‘द कॉर्स’ ह्या आयरिश बंडच्याबॅंडच्या सदस्या आहेत. त्यांनी १९९० साली, आपले बंधू आणि भगिनी, कॅरोलीन, शॅरोन आणि जिम कॉर ह्यांच्याबरोबर, द कॉर्स बॅंडच्या मुख्य गायिका म्हणून पदार्पण केले. त्या चौघांचा हा बॅंड सेल्टीक फोक रॉक आणि पॉप रॉक प्रकारचे संगीत तयार करतो. त्या गाण्याव्यतिरीक्त, टीन व्हिसल, उकुलेले आणि पियानो देखील वाजवतात.
 
== कारकीर्द ==
द कॉर्स ह्या बॅंड बरोबर त्यांनी आत्तापर्यंत सहा स्टुडियो अल्बम, दोन एकत्रित अल्बम्स, एक रिमिक्स अल्बम आणि दोन प्रत्यक्ष अल्बम प्रसिद्ध केले आहेत. अॅंड्रीया ह्यांनी २००७ साली, टेन फीट हाय हा पहिला एकल अल्बम प्रसिद्ध केला. त्यांनी आपल्या पुढचा अल्बम ३० मे २०११ ह्या दिवशी प्रसिद्ध केला. त्या अल्बम मध्ये त्यांच्यासाठी त्यांच्या लहानपणी महत्त्वाची असलेली गाणी त्यांनी स्वतःच्या स्वरात गायली आहेत.
 
== सामाजिक कार्य ==
अॅंड्रीया ह्यांनी अनेक धर्मादायक उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. पावरोती अॅंड फ्रेंड्स लीबेरीयन चिल्ड्रन्स विलेज, इंग्लंडमधील न्यू कॅसल अपॉन टाईन येथील फ्रीमन हॉस्पिटल, उत्तर आयर्लंड येथे झालेल्या बॉम्बस्फोटाच्या बळींसाठी द प्रिन्स ट्रस्ट ह्या संस्थांसाठी त्यांनी निधी संकलनासाठी कार्यक्रम केले. आफ्रिकेतील ‘नेल्सन मंडेला ४६६६४’ ह्या एड्स रोगाबद्दलच्या मोहिमेमध्ये त्या सहभागी होत्या. २ जुलै २००५ रोजी, एडीनबर्ग येथे द कॉर्स ह्यांच्या कार्यक्रमाच्या वेळी त्यांनी ‘मेक पॉवर्टी हिस्टरी’ ह्या मोहिमेचा प्रचार करत बोनो ह्यांच्याबरोबर ‘व्हेन द स्टार्स गो ब्ल्यू’ हे गाणे सादर केले. २००५ साली, त्यांच्या संगीत आणि धर्मादाय क्षेत्रातील त्यांच्या कामासाठी त्यांना त्यांच्या भावंडांसमवेत राणी एलिझाबेथ ह्यांच्याकडून एम. बी. ई. हा सन्मान मिळाला.
[[वर्ग:आयरीश संगीतकार]]