"तिथी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ११८:
 
द्विपुष्कर किंवा किंवा त्रिपुष्कर योग चालू असताना मृताची अंत्येष्टी करू नये, असे सांगितले जाते.
 
==तिथीवरून दिवसाचे चंद्र नक्षत्र काढण्याची स्थूल रीत ==
'''मास दुणा, तिथीगणा, तीन उणे नक्षत्र जाणा.'''
 
मास दुणा - ज्या (हिंदू) महिन्यातील नक्षत्र पाहिजे असेल, त्या महिन्यासुद्धा चैत्रापासून सर्व महिने मोजून त्या संख्येची दुप्पट करावी. अधिक महिना असल्यास तोही मोजावा.<br/>
तिथीगणा - महिन्याच्या क्रमांकाची दुप्पट करून प्राप्त झालेल्या संख्येत ज्या तिथीचे नक्षत्र हवे असेल ती तिथी मिळवावी (बेरीज करावी); कृष्णपक्षाची तिथी असेल तर आणखी १५ मिळवावे. <br/>
तीन उणे नक्षत्र जाणा - वरीलप्रमाणे आलेल्या बेरजेतून ३ वजा करावेत. जो आकडा मिळेल, त्या क्रमांकाचे नक्षत्र हे आपल्याला हवे असलेले नक्षत्र जाणावे. मिळालेले उत्तर २७हून अधिक असल्यास त्यातून २७ कमी करून नक्षत्राचा क्रमांक मिळतो. <br/>
 
उदा० ज्येष्ठ वद्य नवमीचे नक्षत्र हवे असल्यास - ज्येष्ठ हा ३रा महिना, म्हणून ३ ची दुप्पट ६. अधिक ९ + वद्यपक्षासाठी १५ = ३०. ३० वजा ३ = २७, हा हव्या असलेल्या नक्षत्राचा क्रमांक. २७वे नक्षत्र म्हणजे रेवती. म्हणजे ज्येष्ठ वद्य नवमीला चंद्र हा रेवती नक्षत्रात असतो.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/तिथी" पासून हुडकले