"शिवाजी महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
प्रविण दत्ताजी गायकवाड (चर्चा)यांची आवृत्ती 1800820 परतवली.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १२३:
 
== शहाजीराजांना अटक ==
शिवाजीराजांच्या यशस्वी स्वार्‍यांस्वाऱ्या बिथरून शिवाजीराजांना आळा घालण्याची एक युक्ती म्हणून आदिलशहाने शहाजीराजांना अटक केली. शिवाय सुमारे ५००० फौज घेऊन [[फत्तेखान]] नावाच्या सरदाराला शिवाजीराजांवर हल्ला करण्यास पाठवले. शिवाजीराजांनी [[पुरंदर|पुरंदरावर]] फत्तेखानाचा पराभव केला. [[बाजी पासलकर]] सैन्यासकट पळत्या फत्तेखानाच्या पाठलागावर सासवडपर्य़ंत गेले. सासवडजवळ झालेल्या लढाईत बाजी पासलकरांचा मॄत्यू झाला.<br />
 
शिवाजीराजांनी मोगल बादशाह शाहजहान यास त्याच्या दख्खनच्या सुभेदाराकरवी (शहजादा [[मुरादबक्ष]]) पत्र पाठवून शहाजीराजांसकट त्याच्या चाकरीत जायची इच्छा प्रकट केली. त्याचा परिणाम म्हणून शाहजहानाने आदिलशहावर दबाव आणला आणि परिणामी शहाजीराजांची सुटका झाली. परंतु त्यासाठी शिवाजीराजांना [[कोंढाणा]] किल्ला, आणि शहाजीराजांना [[बंगळूर]] शहर आणि कंदर्पीचा किल्ला आदिलशहाला द्यावा लागला.
ओळ १३९:
== अफझलखान प्रकरण ==
[[File:Death of Afzal Khan.jpg|thumb|अफझलखान मृत्यू ]]
आदिलशहाच्या ताब्यात असणारे किल्ले जिंकत राहिल्यामुळे [[इ.स. १६५९]] साली आदिलशहाने दरबारात शिवाजी महाराजांना संपविण्याचा विडा ठेवला. हा विडा दरबारी असलेल्या [[अफझलखान]] नावाच्या सरदाराने उचलला. मोठ्या सैन्यासह आणि लवाजम्यासह अफझलखान मोहिमेवर निघाला. अफझलखान वाईजवळ आला तेव्हा शिवाजीराजांनी सध्याच्या [[महाबळेश्वर]] जवळ असलेल्या [[प्रतापगड|प्रतापगडावरून]] त्यास तोंड देण्याचे ठरवले. तहाची बोलणी सुरू झाली आणि अंतिम बोलणीसाठी शिवाजी महाराजांनी स्वतः यावे असा अफझलखानचा आग्रह होता. पण शिवाजीराजांच्या वकिलांनी (पंताजी गोपीनाथ बोकील यांनी) अफझलखानाला गळ घालून प्रतापगडावरच भेट घेण्यास बोलावले. भेटीच्या नियमांनुसार दोन्ही पक्षांकडील मोजकीच माणसे भेटीसाठी येतील आणि दरम्यान सर्वांनी नि:शस्त्र राहण्याचे ठरले.
 
शिवाजीराजांना अफझलखानच्या दगाबाजपणाची कल्पना असल्यामुळे त्यांनी सावधगिरी म्हणून [[चिलखत]] चढविले आणि सोबत [[बिचवा]] तसेच [[वाघनखे]] ठेवली. [[बिचवा]] चिलखतामध्ये दडविला होता तर वाघनखे हाताच्या पंजाच्या आतमध्ये वळविलेली असल्यामुळे दिसणारी नव्हती. शिवाजी महाराजांसोबत [[जिवा महाला]] हा विश्वासू सरदार होता तर अफझलखानसोबत [[सय्यद बंडा]] हा तत्कालीन प्रख्यात असा [[दांडपट्टा|दांडपट्टेबाज]] होता. प्रतापगडावरील एका छावणीमध्ये भेट ठरली. भेटीच्या वेळी उंचपुर्‍याउंचपुऱ्या, बलदंड अफझलखानाने शिवाजी महाराजांना मिठी मारली आणि शिवाजीराजांचे प्राण कंठाशी आले. त्याच वेळी अफझलखानने कट्यारीचा वार शिवाजी महाराजांवर केला परंतु चिलखतामुळे शिवाजीराजे बचावले. अफझलखानाचा दगा पाहून शिवाजीराजांनी वाघनखे खानाच्या पोटात घुसवली. त्याचबरोबर अफझलखानाची प्राणांतिक आरोळी चहूकडे पसरली. सय्यद बंडाने तत्क्षणी शिवाजीवर दांडपट्ट्याचा जोरदार वार केला जो तत्पर जिवा महालाने स्वतःवर झेलला आणि शिवाजीराजांचे प्राण वाचले. यामुळेच "होता जिवा म्हणून वाचला शिवा" ही म्हण प्रचलित झाली.
 
आधीच ठरलेल्या इशार्‍याप्रमाणेइशाऱ्याप्रमाणे भेटीच्या वेळी तीन तोफांचे बार प्रतापगडावरून काढण्यात आले, आणि खानाच्या छावणीच्या जवळपासच्या झाडाझुडुपांमध्ये दडून बसलेल्या मावळ्यांनी हल्ला करून खानाच्या सैन्याची दाणादाण उडविली. खानाचा मुलगा [[फाजलखान]] आणि इतर काही सरदार लपूनछपून वाईच्या मुख्य छावणीपर्यंत आले. इथे खानाचा [[जनाना]] होता. ते पाठलागावर असलेल्या [[नेताजी पालकर|नेताजीच्या]] सैन्यापासून वाचण्यासाठी खजिना, हत्ती व इतर जड सामान टाकून विजापूरला जनान्यासकट पळाले.
<!-- As the two men hugged each other, Afzal Khan nearly stuck a dagger at Shivaji’s side, but the Maratha passed his arm around the Khan’s waist and, to quote from the admiring biography by Jadunath Sarkar, "tore his bowels open with a blow of steel claws". It is a chilling fact that this episode, in which neither Afzal Khan nor Shivaji appear to have shown much honor, should have been described, amidst the euphoria of the celebrations in 1974-75 to mark the 300th anniversary of the coronation of Shivaji, as the "most glorious event in the history of the Marathas." (See R. V. Herwadkar, "Historicity of Shivaji-Afzal Khan Confrontation", in B. K. Apte, ed., Chhatrapati Shivaji: Coronation Tercentenary Commemmoration Volume (Bombay: University of Bombay, 1974-75.) --><br />
शिवाजीराजांना जनतेत मिळालेला आदर आणि प्रेम अनेक शतकांनंतरही टिकून आहे त्यामागचे त्यांची सहिष्णू वृत्ती हे फार महत्त्वाचे कारण आहे. अफझलखानाच्या मृत्यूनंतर त्यांनी त्याच्या शवाचे अंत्यसंस्कार [[इस्लाम धर्म|इस्लामी]] पद्धतीने करून त्याची एक कबर प्रतापगडावर बांधली आणि त्या कबरीच्या कायम देखभालीची व्यवस्था केली.
ओळ १७८:
 
== शाहिस्तेखान प्रकरण ==
मोगल साम्राज्याचा [[नर्मदा नदी]]पलीकडे विस्तार, तसेच शिवाजी महाराजांच्या राज्यविस्ताराला वेसण घालणे या दोन हेतूंसाठी औरंगजेबाने त्याचा मामा [[शाहिस्तेखान]] याला [[दख्खन|दख्खनच्या]] मोहिमेवर पाठविले. प्रचंड मोठा लवाजमा, सैन्य आणि फौजफाटा सोबत घेऊन शाहिस्तेखान निघाला आणि वाटेत असणार्‍याअसणाऱ्या प्रत्येक राज्यात, गावात त्याने दहशत पसरवीत जमेल तेवढा जमेल तेथे विध्वंस केला. शेवटी पुण्याजवळील [[चाकणचा किल्ला]] जिंकून पुण्यातील शिवाजीराजांच्या [[लाल महाल|लाल महालातच]] तळ ठोकला. शिवाजीराजांनी खानाचा बंदोबस्त करण्यासाठी एक धाडसी निर्णय घेतला तो म्हणजे लाल महालात शिरून खानाला संपविण्याचा. लाल महालात आणि अवतीभोवती खडा पहारा असे आणि महालात शिरणे अतिशय जोखमीचे काम होते.
 
एके रात्री लाल महालाजवळून जाणार्‍याजाणाऱ्या एका लग्नाच्या मिरवणुकीचा आधार घेऊन काही मोजक्या माणसांसह स्वतः शिवाजी महाराज लाल महालात शिरले. महालाचा कानाकोपरा माहीत असल्यामुळे लवकरच प्रत्यक्ष शाहिस्तेखानच्या खोलीत शिवाजी महाराजांनी प्रवेश केला. तोपर्यंत महालात कोठेतरी झटापट सुरू झाल्यामुळे शाहिस्तेखानला जाग आली आणि तेवढ्यातच शिवाजीराजांना समोर पाहून खानाने जीव वाचविण्यासाठी सरळ खिडकीतून खाली उडी घेतली. शिवाजी महाराजांनी चपळाईने केलेला वार हुकल्यामुळे खानाच्या प्राणावर बेतण्याऐवजी त्याची तीन बोटे कापली गेली. या प्रकरणामुळे मोगल साम्राज्याची जी नाचक्की झाली ती स्वराज्यासाठी अधिकच फायद्याची ठरली. जे राजे मोगलांच्या आश्रयामुळे शिवाजी महाराजांना जुमानत नसत ते आता शिवाजीराजांच्या पराक्रमामुळे त्यांच्या बाजूने झुकले. आणखी एक वेगळा परिणाम या प्रकरणामुळे झाला, तो म्हणजे शिवाजीराजांना मिळालेला मानवी क्षमतेपेक्षा मोठा दर्जा आणि त्यामुळे जोडलेल्या दंतकथा.
 
अनेकदा या गोष्टीचा अप्रत्यक्ष फायदा शिवाजी महाराज किंवा त्यांच्या सैन्याला मिळाला. शत्रू सैन्यामध्ये शिवाजी महाराज घुसल्याच्या केवळ अफवा पसरवून संख्येने किरकोळ असलेल्या मावळ्यांनी संख्येने अनेक पटींनी मोठ्या सैन्याची उडविलेली दाणादाण ही याच गोष्टीची साक्ष देऊ शकते. [[इ.स. १६६३]] सालचे शाहिस्तेखान प्रकरण शिवाजीराजांच्या जीवनात आणखी एका नाट्यमय प्रसंगाची भर घालून गेले.
ओळ २४१:
{{मुख्यलेख|मावळ}}
 
छत्रपती शिवाजीमहाराजांच्या सैन्यातील मावळ्यांनी शिवाजीराजांच्या सोबत हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात मोठा सहभाग नोंदवला. [[सह्याद्री]]च्या दोन डोंगररांगांच्या मधल्या खोर्‍यालाखोऱ्याला "मावळ" आणि खोर्‍यातीलखोऱ्यातील सैनिकांना "मावळे" म्हणत.