"वैजनाथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन संदर्भा विना भला मोठा मजकुर !
छो 2409:4042:2E95:AB68:B4EC:70FF:FEB9:C498 (चर्चा)यांची आवृत्ती 1807024 परतवली.
खूणपताका: उलटविले
ओळ १७:
 
जवळच्या [[अंबेजोगाई]]पासून परळी वैजनाथ २५ कि. मी. अंतरावर आहे. तर परभणीपासून ६० कि.मी. अंतरावर आहे. या ठिकाणांपासून वैजनाथला जाण्यासाठी वाहनाची सतत सोय आहे. परळी येथे एक औष्णिक विद्युतकेंद्र आहे. येथे औद्योगिक वसाहत आहे.
 
परळी वैजनाथ या ठिकाणी श्री भगवान शंकर प्रकट होण्यामागे एक कथा सांगितली जाते.
राक्षसांचा राजा रावण भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी हिमालय पर्वत जातो. भगवान शंकराची आराधना करतो, नामस्मरण करतो, तपश्चर्या करतो. श्री भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी प्रयत्न करतो. रावणाची ही तपश्चर्या नामस्मरण पाहून भगवान शंकर प्रसन्न होतात. आणि रावणाला वर मागण्यास सांगतात. प्रसन्न झालेल्या श्री भगवान शंकरांना रावण नमस्कार करून भगवान शंकरांना आपल्या लंकेमध्ये विराजमान होण्यासाठी प्रार्थना करतात. हे भगवान शंकर आपण माझ्यासोबत लंकेमध्ये चालावे व त्याठिकाणी आपण कायमस्वरूपी वास्तव्य करावे अशी विनंती तो भगवान शंकरांना करतो. परंतु भगवान शंकर आपले कैलाश पर्वत व आपली पत्नी पार्वती तिला सोडून जाण्या साठी तयार नसतात आणि ते रावणाला नकार देतात आणि सांगतात रावण मी तुझ्याबरोबर लंकेत येऊ शकत नाही. कैलास हे माझे घर आहे पार्वती ही माझी पत्नी आहे. त्यामुळे मी या ठिकाणी वास्तव्य करणार आहे असे सांगतात . भगवान आपल्याबरोबर लंकेला येत नाहीत हे ऐकून रावण क्रोधीत होतो. या रागांमध्ये तो संपूर्ण कैलास पर्वत उचलण्यासाठी प्रयत्न करतो. तो आपल्या संपूर्ण शक्तीनिशी कैलास पर्वत उचलून लंकेला नेण्यासाठी प्रयत्न करत असतो. त्यामुळे संपुर्ण चलबिचलता पसरते आणि रावणाच्या प्रयत्नाने माता पार्वती भयभीत होतात,विचलित होतात आणि शंकराजवळ आराधना करतात की हे प्रभू आपण या संकटापासून सर्वांचे संरक्षण करावे. माता पार्वतीला असे भयभीत झालेले पाहून भगवान शंकर आपल्या पायांनी कैलास पर्वत दाबून ठेवतात. कैलास पर्वतावर पायाचा जोर लावतात. या शक्तीने रावणाचे हात कैलास पर्वताचा खाली दाबले जातात. यापासून सुटका होण्यासाठी तो भगवान शंकराची आराधना करतो. आणि म्हणतो प्रभू मला माफ करा मला क्षमा करा आणि त्याच ठिकाणी बसतो. त्याची ही दयनीय अवस्था पाहून पार्वतीमाता त्याच्यावर प्रसन्न होतात आणि भगवान शंकराला विनंती करतात हे प्रभू आपण त्याचे रक्षण करावे, क्षमा करावी आणि त्याला या जाचातून मुक्त करावे अशी विनंती पार्वतीमाता भगवान शंकराकडे करते. शंकर पुन्हा रावणा जवळ प्रकट होतात आणि त्याला त्याच्या या विवंचनेतून मुक्त करतात आणि वर मागण्यास सांगतात. तरीदेखील रावण आपला अट्टाहास सोडत नाही तो भगवान शंकराला आपल्या लंकेमध्ये येण्यास, विराजमान होण्यासाठी विनंती करतो. रावणाची ही इच्छा पाहून भगवान शंकर म्हणतात की मी स्वतः किंवा मी प्रत्यक्षात लंकेत तर येऊ शकत नाही परंतु मी तुला हे माझे लिंग देतो या लिंगाची स्थापना किंवा या लिंगाची पूजा म्हणजेच माझी पूजा आहे असे समज आणि हे लिंग तू आता तुझ्या लंकेमध्ये जाऊन स्थापित कर. त्याला सांगतात की हे लिंग तू जात असताना पृथ्वीवर कोठेही ठेऊ नकोस ज्या ठिकाणी तू हे लिंग ठेवशील त्या ठिकाणी स्थापित होईल याची काळजी घे. रावण भगवान शंकरांनी दिलेले लिंग घेऊन आपल्या लंकेकडे जाण्यासाठी निघतात. वाटेत जात असताना त्यांना लघु शंखा येथे लघुशंका त्यांना आवरता येत नाही. लघुशंका करण्यासाठी उतरतात आणि आपल्याजवळ असलेले लिंग त्या ठिकाणी चारा चालण्यासाठी आलेल्या एका व्यक्ती जवळ देतात. त्याला सांगतात की मी लघुशंका करुन येईपर्यंत हे लिंग तू तुझ्या हातामध्ये ठेव. जमिनीवर ठेवू नकोस. असे सांगून ते लघुशंका करण्यासाठी निघून जातात. लिंग खूप वजनदार असल्याने पशुपालन करणारा व्यक्ती ते लिंग तो खाली ठेवतो . रावण ते लिंग उचलण्यासाठी खूप प्रयत्न करतो परंतु तेलिंग काही उचलले जात नाही. शेवटी रावण लिंगावर आपल्या बोटाचा ठसा उमटवतो आणि लंकेला निघून जातो. रावण निघून जाता या ठिकाणी ब्रह्मदेव व स्वर्गलोका तील सर्व देऊ लोक या ठिकाणी येतात आणि लिंगाची पूजा, नामस्मरण करुन निघून जातात. हेच ते परळी वैजिनाथ लिंग होय.
 
या लिंगाचे दर्शन घेतल्याने मानवाच्या मनातील असणाऱ्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी ख्याती आहे.
(डॉ.नागेश दत्तात्रय सर्वदे)
 
 
==आणखी एक वैजनाथ==
"https://mr.wikipedia.org/wiki/वैजनाथ" पासून हुडकले