"गोपाळ हरी देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1780977 by TivenBot on 2020-04-26T10:56:42Z
ओळ ९८:
 
==अन्य सामाजिक कार्य==
मुंबई प्रांताचे तेव्हाचे गव्हर्नर [[हेन्‍री ब्राऊन]] यांच्या पुढाकाराने गोपाळ हरी देशमुखांनी इ.स. १८४८ साली पुण्यात एक ग्रंथालय काढले. ''पूना नेटिव जनरल लायब्ररी'' या नावाने स्थापन झालेले हे ग्रंथालय पुढे ''पुणे नगरवाचन मंदिर'' म्हणून प्रसिद्ध झाले <ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.masapapune.org/MASAPAPune/History.aspx | title = महाराष्ट्र साहित्य परिषदेचा इतिहास | प्रकाशक = महाराष्ट्र साहित्य परिषद | अ‍ॅक्सेसदिनांक = १८ फेब्रुवारी, इ.स. २०१२ | भाषा = मराठी }}{{मृत दुवा}}</ref>. प्रामुख्याने महाराष्ट्रात व गुजरातमध्ये त्यांनी आपल्या सामाजिक कार्याचा ठसा उमटवला.
 
त्यांची [[निस्पृह]] व [[निःपक्षपाती]] म्हणून ख्याती होती. साताऱ्याचे प्रिन्सिपॉल सदर अमीन यांना काही कारणास्तव निलंबित करण्यात आले. त्यांच्या जागी गोपाळरावांची नेमणूक करण्यात आली. सदर अमीन यांची चौकशी चालू झाल्यावर चौकशी प्रमुख म्हणून त्यांनी गोपाळरावांचेच नाव सुचविले. त्यांचा गोपाळरावांच्या निःपक्षपातीपणावर विश्वास होता. इ.स. १८५६ साली गोपाळराव ‘असिस्टंट इनाम कमिशन‘ या पदावर नेमले गेले. इ.स. १८६७ साली त्यांनी अहमदाबाद येथे स्मॉल कॉज कोर्टात जज्ज म्हणून काम करण्यास सुरुवात केली. गुजरातमधील वास्तव्यात त्यांनी विविध उपक्रम कार्यान्वित केले. येथील ''प्रेमाभाई इन्स्टिट्यूट''तर्फे ते दरवर्षी व्याख्यानमाला करवीत आणि स्वतःही अनेक विषयांवर भाषणे देत. तेथे त्यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली, तसेच गुजराती पुनर्विवाह मंडळ स्थापन केले. ''[[गुजरात व्हर्नाक्युलर सोसायटी]]'' ऊर्जितावस्थेत आणली. [[गुजराती]] व [[इंग्लिश भाषा]] भाषेत ''हितेच्छु'' नावाचे साप्ताहिक काढले. त्यांनी गुजरातमध्ये गुजराती वक्तृत्वसभा स्थापन केली. गुजरातमध्ये त्यांनी सुमारे बारा वर्षे वैचारिक उद्‌बोधनाचे कार्य केले. गुजराथमधील अनेक सामाजिक व अन्य संस्थांचे ते पदाधिकारी होते.