"पंचांग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1781318 by TivenBot on 2020-04-26T11:00:52Z
ओळ ४१४:
==मराठी पंचांग छापायची सुरुवात==
शके १९३८मध्ये (इ.स. २०१६) या वर्षी छापील पंचांगाचा शतकोत्तर अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे. पूर्वी छपाईची कला उपलब्ध नसल्याने पंचांगे ही हस्तलिखित तयार करून त्यातील माहिती तोंडीच सर्वाना करून दिली जात असे. छापील साहित्याला तत्कालीन कर्मठ लोक -शाईत प्राण्यांची चरबी मिसळलेली असते- हे कारण देऊन हातही लावत नसत. अशा काळात धर्माशी संबधित साहित्य उत्तम व सुबकपणे छापले तर ते अशा धर्ममार्तंडाच्या हातात घेतले जाऊन हळूहळू गैरसमज निवळेल असा दूरगामी विचार गणपत कृष्णाजी या मराठी माणसाने केला. हे क्रांतिकारक तंत्रज्ञान रुढ करण्यासाठी पहिले मराठी छापील पंचांग १६ मार्च १८४१ रोजी गणपत कृष्णाजी पाटील यानी शिळाप्रेसवर छापून प्रसिद्ध केले. त्यासाठी त्यानी संपूर्ण पंचांग स्वतःच्या अक्षरात लिहिले होते. त्या पहिल्या छापील पंचांगाचे गणित रखमाजी देवजी मुले यांनी केले होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा= http://www.loksatta.com/mumbai-news/ganpat-krishnaji-made-marathi-first-panchang-1219839/ |title=मराठीतील पहिल्या छापील पंचांगाचे कर्ते दुर्लक्षितच
|publisher= लोकसत्ता दैनिक |date=२७ मार्च, इ.स. २०१६}}
</ref> छापील पंचांगाच्या शतकोत्तर अमृत महोत्सवानिमित्त २०१६ सालच्या या नूतन शकवर्षात 'पंचांग' या विषयावर दा.कृ. सोमण हे पंच्याहत्तर व्याख्याने देणार आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा= http://www.loksatta.com/thane-news/gudi-padva-twice-in-new-year-1223570/ |title= शालिवाहन शक १९३८ या नववर्षांत दोनदा गुढी पाडवा |publisher= लोकसत्ता दैनिक |date=६ एप्रिल, इ.स. २०१६}}
</ref>
 
"https://mr.wikipedia.org/wiki/पंचांग" पासून हुडकले