"इंग्लंड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो →‎फुटबॉल: Date error cleanup, replaced: जुलै, → जुलै using AWB
ओळ ८७:
 
=== फुटबॉल ===
फुटबॉल या खेळाच्या शोध हा आजही एक वादाचा विषय आहे. [[चीन]], [[मेक्सिको]], [[ग्रीस]] मधील प्राचीन शिल्पांवरून फुटबॉलचे अस्तित्व इंग्लंडच्या जन्माअगोदर होते हे सिद्ध होते. त्यामुळे मूळ फुटबॉलच्या शोधाचे श्रेय इंग्लंडकडे येत नाही. परंतु आजच्या आधुनिक फुटबॉलचे जन्मस्थान इंग्लंड आहे यात दुमत नाही. १६ व्या १७ व्या शतकातील फुटबॉल या विषयावरील चित्रे या खेळाची तत्कालीन लोकप्रियता दर्शावतात. कुलीन लोकांसाठी क्रिकेट, कामगार, गरिबांचा खेळ म्हणजे फुटबॉल अशी सामाजिक दरी अस्तित्वात होती. ब्रिटिश साम्राज्यात फुटबॉल सर्व वसाहतींमध्ये पोहोचला. [[इ.स. १८५०]] च्या सुमारास फुटबॉलचे आधुनिकीकरण चालू झाले. रस्त्यांवर, कामगारवस्त्यांमध्ये रानटीपणे खेळला जाणारा हा खेळ मोकळ्या मैदानांवर खेळला जाऊ लागला, हळूहळू नियम घडत गेले व यांचेच कालांतराने फुटबॉल क्लबमध्ये रूपांतर झाले व त्यातील काही आज जगप्रसिद्ध फुटबॉल क्लब म्हणून मिरवत आहेत. साधारणपणे याचवेळेस १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपमधील इतर देशात इंग्रज फुटबॉलवेड्यांनी फुटबॉल खेळ पोहोचवला व पहाता पहाता हा खेळ जागतिक स्तरावर सर्वाधिक लोकप्रिय खेळ बनला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Sport_in_England&oldid=226816155|title=Sport in England|date=20 जुलै, 2008|via=Wikipedia}}</ref>
 
इंग्लंडमध्येही फुटबॉल हा सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे. लोकप्रियतेचे जाळे हजारो लहान मोठ्या फुटबॉलक्लबंनी विणले आहे. फुटबॉल असोसिएशन ही मध्यवर्ती संस्था इंग्लिश फुटबॉलचे नियंत्रण करते. इंग्लंडमधील इंग्लिश प्रीमियर लीग ही आजच्या घडीची, जागतिक स्तरावर तुलना केल्यास सर्वाधिक लोकप्रिय लीग आहे. याचे चाहते केवळ इंग्लंडमध्येच नाहीतर जगातील बहुतांशी सर्वच देशांत आहेत. इंग्लिश लीग ही तीन ते चार स्तरांमध्ये खेळली जाते. प्रीमियर लीग, प्रथम वर्ग, द्वितीय वर्ग, तृतीय वर्ग प्रत्येक स्तरामध्ये २० किंवा अधिक क्लब एकमेकांशी होम व अवे पद्धतीने साखळी सामने खेळतात. यात सर्वाधिक गुण मिळवणारा संघ वर्गस्तरावर विजयी घोषीत होतो व पहिले तीन संघ वरील वर्गात खेळण्यास पात्र ठरतात. तसेच शेवटचे तीन संघांची खालच्या वर्गात रवानगी होते. प्रीमियर लीग मधील विजेता व उपविजेता चॅपियन्स लीगमध्ये खेळतात. याचबरोबर, हे क्लब एफ.ए. कप, शेफील्ड शील्ड अशा अनेक सामन्यांमधील विजेतेपदांसाठी खेळतात. इंग्लंडमधील क्लब हे जगातील सर्वाधिक श्रीमंत मानले जातात. मॅचेस्टर युनायटेड, लिव्हरपूल, आर्सेनल, चेलसी हे जगातील सर्वाधिक श्रीमंत क्लबांमध्ये गणले जातात, तसेच प्रीमियर लीगमधील यांचा यशाचा आलेख उल्लेखनीय आहे. लिव्हरपूल हा इंग्लंडच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी क्लब आहे. त्याखालोखाल मॅचेस्टर युनायटेड, आर्सेनल व एव्हरटन यांचा क्रमांक लागतो. इंग्लंडचे क्लब हे केवळ इंग्लंड मध्येच यशस्वी नाहीत तर युरोपीयन व जागतीक स्तरावर देखील यशस्वी आहेत. मॅचेस्टर, लिव्हरपूल, नॉटिंगहॅम या सारख्या क्ल्बनी युरोपीय विजेतेपदे मिळवली आहेत.
"https://mr.wikipedia.org/wiki/इंग्लंड" पासून हुडकले