"पु.ल. देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,२२३ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
 
==चित्रपटसृष्टीत पदार्पण==
१९४७ ते १९५४ या काळात त्यांनी चित्रपटांमध्ये आणि चित्रपटांसाठी काम केले. [[वंदेमातरम् (चित्रपट)|वंदे मातरम्‌]], [[दूध भात (चित्रपट)|दूधभात]]‘ आणि [[गुळाचा गणपती]] या चित्रपटांत त्यांनी अष्टपैलू कामगिरी केली. गूळाचागुळाचा गणपती या चित्रपटांत कथा, पटकथा, काव्य, संगीत, भूमिका आणि दिग्दर्शन सर्वच पुलंचे (सबकुछ पु.ल!) होते.{{संदर्भ हवा}}
 
[[भाग्यरेखा (चित्रपट)|भाग्यरेखा]] या मराठी चित्रपटात पुलंची भूमिका होती.
 
१९४७सालच्या [[मो.ग. रांगणेकर|मो.ग. रांगणेकरांच्या]] [[कुबेर (चित्रपट)|कुबेर]] चित्रपटाला देशपांडे यांनी संगीत दिले आणि चित्रपटातील गाणी देखील गायले. वंदे मातरम्‌मध्ये देशपांडे व त्यांच्या पत्‍नी सुनीताबाई यांच्या प्रमुख भूमिका होत्या. यात पु.ल. देशपांडे गायक-नट होते. पु.ल.देशपांडे यांचा [[देवबाप्पा (चित्रपट)|देवबाप्पा]] प्रसिद्ध झाला व त्यातील ’’नाच रे मोरा’’ हे गाणे अनेक दशके प्रसिद्धीत राहिले. [[पुढचे पाऊल (चित्रपट)|पुढचे पाऊल]] या चित्रपटात त्यांनी ''कृष्णा महारा''ची भूमिका केली.{{संदर्भ हवा}}
 
==संगीतकार पु.ल. देशपांडे==
पु. ल. देशपांडे यांनी 'अंमलदार','गुळाचा गणपति','घरधनी','चोखामेळा', दूधभात', 'देव पावला', 'देवबाप्पा', 'नवराबायको', 'नवे बिऱ्हाड', 'मानाचे पान' आणि 'मोठी माणसे' या अकरा चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले. याशिवाय ज्योत्स्ना भोळे, माणिक वर्मा व आशा भोसले यांच्याकडून पुलंनी गाऊन घेतलेल्या भावगीतांची संख्या विशीच्या घरात जाईल.
 
'गुळाचा गणपती'मधील 'इंद्रायणी काठीं' ह्या भीमसेन जोशींनी लोकप्रिय केलेल्या गाण्याचे संगीत पु.ल. देशपांडे यांचे होते.
 
==नभोवाणी आणि दूरचित्रवाणी==
५७,२९९

संपादने