"अरविंद थत्ते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ जोडला.
माहितीत भर.
ओळ १:
[[चित्र:Arwind Thatte.JPG|इवलेसे|right|180px|अरविंद थत्ते]]
पंडित '''अरविंद थत्ते''' (जन्म: १७ नोव्हेंबर १९५८)<ref>{{स्रोत पुस्तक|title=चित्पावन ब्राह्मण चरित्र कोश, वर्ष १८२१ ते २०००, खंड २|last=घुले|first=माधव|publisher=अखिल चित्पावन ब्राह्मण सेवा संस्था|year=२०१७|isbn=|location=मुंबई|pages=१७१}}</ref> हे भारतातील एक अग्रगण्य [[संवादिनी]] वादक आहेत. त्यांचा जन्म वडील दिगंबर आणि आई वत्सला यांच्या पोटी एका संगीतप्रेमी कुटुंबात झाला. त्यांचे आजोबा कीर्तनकार, संगीत नाटकातील अभिनेते तसेच चित्रकार होते. वडील व्यवसायाने शिक्षक होते. तसेच वडील आणि मोठे भाऊ हार्मोनियम वाजवीत. अरविंद वयाच्या ६व्या वर्षी पेटी वाजवायला शिकले. स्वतःच सराव करून करून त्यांना पेटी उत्तम वाजवायला येऊ लागली. मात्र त्यानंतर ते कंठसंगीत शिकण्यासाठी [[भारत गायन समाज]]ात दाखल झाले; आणि नंतर [[तबला]] शिकण्यासाठी पंडित [[जी.एल. सामंत]] यांच्याकडे गेले. पुढे त्यांनी सुधीर दातार, सुहास दातार आणि पंडित [[जसराज]] यांना गुरू केले आणि त्यांच्याकडून संगीताचे अधिक ज्ञान मिळवले. पं. जसराज यांच्याकडे त्यांनी बारा वर्षे गायनाचे शिक्षण घेतले.
 
अरविंद थत्ते हे गणितामधले एम.एस्‌सी. पीएच.डी (पुणे विद्यापीठ) असून संगीतासाठी त्यांनी त्यांच्या गणितक्षेत्रापासून फारकत घेतली. १९८२ साली ते [[आकाशवाणी]]च्या एकल पेटीवादनाच्या स्पर्धेत पहिले आले होते.
 
अरविंद थत्ते यांनी [[कुमार गंधर्व]], [[किशोरी आमोणकर]], [[के.एल. गिंडे]], [[जसराज]], [[जितेंद्र अभिषेकी|जीतेंद्र अभिषेकी]], [[प्रभा अत्रे]], [[परवीन सुलताना]], [[मालिनी राजूरकर|मालिनी राजुरकर]], [[लक्ष्मी शंकर]], [[विजय सरदेशमुख]], [[सी.आर. व्यास]], [[शोभा गुर्टू]] आदि अनेक नामवंत कलाकारांच्या गायनात [[संवादिनी|संवादिनीची]] संगत केली असून शिवाय ते हार्मोनियमचे एकल वादनही करतात. अरविंद थत्ते यांनी पुण्याच्या [[सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव|सवाई गंधर्व महोत्सव]]ात ३५ गायकांना एकूण ७०हून अधिक वेळा पेटीची साथ केली आहे.