"सरोज खान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: सरोज खान (जन्म : मुंबई, २२ नोव्हेंबर १९४८; मृत्यू : मुंबई, ३ जुलै २०२...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
सरोज खान (जन्म : मुंबई, २२ नोव्हेंबर १९४८; मृत्यू : मुंबई, ३ जुलै २०२०) ही हिंदी चित्रपटसृष्टीतली एक आघाडीची नृत्य दिग्दर्शिका होती. सरोज खान यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक बी. सोहनलाल यांच्याकडून नृत्यदिग्दर्शनाचे धडे गिरवले होते.
 
वयाच्या तिसऱ्या वर्षीपासून सरोज खान यांनी हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. सुरुवातीला बाल कलाकार म्हणून काम केले आणि त्यानंतर त्यांनी बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. सरोज खान यांनी सन १९७४मध्ये त्यांनी साहाय्यक दिग्दर्शक म्हणून ‘गीता मेरा नाम’ या चित्रपटासाठी काम केले होते.
 
हिंदी सिनेसृष्टीत सरोज खान यांनी सुमारे पाच दशके नृत्यदिग्दर्शक म्हणून आपली कारकीर्द गाजवलेली आहे. श्रीदेवीपासून माधुरी दीक्षितपर्यंतच्या अनेक अभिनेत्रींना ‘डान्स क्वीन’चा मान मिळवून देण्यात सरोज खान यांचा मोलाचा वाटा आहे. श्रीदेवीचे ‘हवा हवाई…’ आणि माधुरी दीक्षितचे ‘धक धक करने लगा…’ या गाण्यातील नृत्यांना सरोज खान यांचे दिग्दर्शन होते. ही गाणी आणि त्या गाण्यांतील नृत्ये आजही लोकप्रिय आहेत.
 
सरोज खान यांनी त्यांच्या कार्यकाळात सुमारे २०००हून अधिक गाण्यांचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. २०१९मध्ये आलेल्या माधुरी दीक्षितच्या ‘कलंक’ चित्रपटातील ‘तबाह हो गये…’ या गाण्याचे केलेलं नृत्यदिग्दर्शन सरोज खान यांचे अखेरचे होते. सरोज खान यांना तीन वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या लोकप्रिय गाण्यांच्या यादीत मिस्टर इंडिया (१९८७) चित्रपटातील ‘हवा हवाई…’, तेजाब चित्रपटातील (१९८८) ‘एक दो तीन…’, बेटा चित्रपटातील (१९९२) ‘धक धक करेने लगा…’ आणि देवदास चित्रपटातील (२००२) चित्रपटातील ‘डोला रे डोला’ आदींचा समावेश होतो.
 
 
[[वर्ग:हिंदी नृत्य दिग्दर्शक]]
"https://mr.wikipedia.org/wiki/सरोज_खान" पासून हुडकले