"मूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्याचा हक्क (कलम ३२)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
'''मूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्याचा हक्क''' हे [[भारतीय संविधान|भारतीय संविधानातील]] एक कलम (कलम ३२) आहे.
 
=== '''ओळख''':- ===
भारतीय संविधान देशातील सर्व नाकरिकांना काही मूलभूत हक्क प्रदान करते जे घटनेच्या भाग ३ मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. या मूलभूत हक्कांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य असे की या हक्कांची अंमलबजावणी करण्याचा हक्क देखील एक मूलभूत हक्क आहे (कलम ३२) . घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या हक्कला संविधानाचा आत्मा असे संबोधले आहे, ते म्हणतात या कलमशिवाय भारतीय संविधान हे काहीच उपयोगाचे नाही. भारताने ही प्राधिलेखांची पध्दत ब्रिटिश संविधानाकडून घेतली आहे. या कलमा नुसार जर कोणत्याही नागरिकाच्या मूलभूत हक्कांची पायमल्ली झाली असेल तर तो नागरिक थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतो.