"बाळ ठाकरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
विकिपीडियाच्या मानकांनुसार नाही
विकिपीडियाच्या मानकांनुसार नाही
ओळ ६३:
 
== शिवसेनेची स्थापना ==
महाराष्ट्रात निर्माण झालेले - मराठी द्वेषाचे व मराठी माणसांवरील अन्यायाचे - [[व्यंग]] केवळ चित्रांनी दूर होणार नाही. त्यासाठी आणखी संघटित प्रयत्न करायला हवेत असा विचार बाळासाहेबांनी केला. 'हर हर महादेवची' गर्जना मराठी माणसाच्या मनात पुन्हा एकदा घुमायला हवी आणि प्रत्येक मराठी माणसाने महाराष्ट्राचा स्वाभिमान मनात बाळगायला हवा. एक दिवशी वडिलांनी, प्रबोधनकार ठाकरेंनी प्रश्न विचारला..“बाळ लोके तर जमली पण याला संघटनेचे रूप देणार की नाही? काही नाव सुचतंय का संघटनेसाठी?” बाळासाहेब बोलले ..”विचार तर चालू आहे..पण संघटनेला नाव…” “मी सांगतो नाव….....[[शिवसेना]].........यानंतर बाळासाहेबांनी [[जून १९]], [[इ.स. १९६६]] रोजी ‘शिवसेनेची स्थापना केली. समाजसुधारकांची समृद्ध परंपरा असलेला महाराष्ट्र पुरोगामी आहे, पण मराठी माणूस मागेच राहिला आहे. महाराष्ट्रात सुविधा आहेत, पण मराठी माणूस दुविधेत आहे. महाराष्ट्रात उद्योग आहेत, पण मराठी तरुण बेरोजगार; तर महाराष्ट्रात पैसा आहे पण मराठी माणूस गरीब. ही परिस्थिती बाळासाहेबांनी जाणली. [[महाराष्ट्र|महाराष्ट्राला]] [[भारत|भारतात]] मान आहे पण मराठी माणूस महाराष्ट्रातच (प्रामुख्याने मुंबईत) अपमानित होतो आहे. हा विरोधाभास बाळासाहेबांनी [[शिवसेना|शिवसेनेच्या]] माध्यमातून महाराष्ट्राच्या लक्षात आणून दिला. यातूनच मराठी माणूस संघटित झाला. शिवसेनेचा पहिला [[मेळावा]] [[ऑक्टोबर ३०]], [[इ.स. १९६६]] रोजी [[शिवाजी पार्क|शिवतीर्थ]]<nowiki> मैदानावर संपन्न झाला. या मेळाव्यास सुमारे ५ लाख लोकांनी गर्दी केली होती. या मेळाव्यापासूनच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब आणि शिवतीर्थावरील (शिवाजी पार्कवरील) मराठी माणसांची प्रचंड गर्दी यांच्यामध्ये नातेसंबंध प्रस्थापित होण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून आजपर्यंत शिवतीर्थावरून, गर्दी आणि बाळासाहेब ठाकरे हे इथे जुळलेले गणित आजतागायक फ़िसकटलेले नाही.{{</nowiki>
 
== शिवसेना - भाजप युती ==
[[शिवसेना]]प्रमुख बाळासाहेब व [[भारतीय जनता पक्ष|भा.ज.प.]] चे दिवंगत नेते [[प्रमोद महाजन]] यांच्या मुत्सद्दीपणातून शिवसेना-भा.ज.प. युती आकाराला आली. तसेच पुढे प्रामुख्याने शिवसेनाप्रमुखांच्या झंझावाती सभांमुळे-दौऱ्यांमुळे [[इ.स. १९९५]] मध्ये शिवसेना-भारतीय जनता पार्टीचे सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले, आणि [[मनोहर जोशी]] हे शिवशाहीचे पहिले [[मुख्यमंत्री]] बनले. हे महाराष्ट्रातील खर्‍या अर्थाने पहिले कॉंग्रेसेतर सरकार होते. हा सत्तांतराचा चमत्कार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तृत्व व कार्यशैलीमुळेच घडला.
 
<!--== हिंदुत्व ==
[[हिंदुत्व]] या मुद्याबाबतही बाळासाहेबांनी आपले विचार रोखठोकपणे मांडले. बॉंबस्फोट, देशविघातक कृत्ये घडवणार्‍या धर्मांधांना या देशात राहण्याचा अधिकार नाही. [[मतपेटी|मतपेटीचे]] राजकारण करत अशा मुस्लिमांचे लांगुलचालन कोणी करू नये. [[भारत|भारताला]] आपला देश मानणार्‍या राष्ट्रवादी मुस्लीम लोकांना आपला कोणत्याही प्रकारचा विरोध नाही - असे स्पष्ट विचार त्यांनी शिवसैनिकांसमोर व जनतेसमोर मांडले. या स्पष्ट व रोखठोक भूमिकेमुळेच हिंदुहृदयसम्राट ही त्यांना प्राप्त झालेली उपाधी सार्थ ठरते.-->
 
== राजकीय कार्य ==
"https://mr.wikipedia.org/wiki/बाळ_ठाकरे" पासून हुडकले