"वेदांग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
me;e
No edit summary
खूणपताका: अनावश्यक nowiki टॅग संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ १:
{{विकिकरण}}
वेद वाङ्मय हे [[भारतीय संस्कृतीचासंस्कृती]]<nowiki/>चा अविभाज्य घटक म्हणता येईल. [[ऋग्वेद]], [[यजुर्वेद]], [[सामवेद]], [[अथर्ववेद]] या वेदांना व्यक्ती मानून सहा उपयुक्त शास्त्रे ही त्या व्यक्तीची अंगे म्हणजेच अवयव आहेत अशी कल्पना केली आहे. हीच सहा शास्त्रे म्हणजे वेदांगे होत.
 
'''वेदांग :'''
ओळ १२:
'''१) शिक्षा:'''
 
शिक्षा म्हणजे उच्चारणशास्त्र! [[यज्ञ|यज्ञकर्म]] करताना वेदांतील मंत्रांचे उच्चारण करावे लागते. त्यासाठी मंत्र कसे म्हणावेत, या मंत्रांमध्ये कोणकोणते वर्ण वापरले आहेत, तो वर्ण कसा उच्चारायचा इत्यादी प्रश्नांची उत्तरे शिक्षा शास्त्रामध्ये मिळतात.
 
शिक्षा या वेदांगाचे मूळ आपल्याला ऋग्वेदामध्ये सापडते. याशिवाय [[तैत्तिरीय उपनिषदामध्येउपनिषद्|तैत्तिरीय उपनिषदा]]<nowiki/>मध्ये शिक्षा या वेदांगाची व्याख्या दिलेली आहे –
 
ॐ शीक्षां व्याख्यास्यामः ।
ओळ २६:
'''२) कल्पसूत्रे:'''
 
श्रौतसूत्रे, गृह्यसूत्रे, शुल्बसूत्रे आणि धर्मसूत्रे अशा चार प्रकारच्या ग्रंथांना कल्पसूत्रे असे म्हणतात. श्रुतींनी म्हणजेच वेदांनी सांगितलेले यज्ञ कसे करावेत हे सांगणाऱ्या ग्रंथांना श्रौतसूत्रे असे म्हणतात. अग्निष्टोम, [[अश्वमेध यज्ञ|अश्वमेध]], वाजपेय इ. यज्ञांचे वर्णन यामध्ये येते. दैनंदिन जीवनात आवश्यक असणारे यज्ञ सांगणाऱ्या ग्रंथांना गृह्यसूत्रे असे म्हणतात. मनुष्य जन्माला आल्यापासून त्याच्या मृत्यू पर्यत करण्यात येणारे संस्कार, नवीन घर बांधतानाचा विधी, काही प्रकारच्या शांती इत्यादी वर्णन गृह्यसूत्रांमध्ये येते. यज्ञवेदी, अग्निकुंडे आणि यज्ञशाळा बांधताना मोजमापासाठी दोरी आवश्यक असते. या दोरीला शुल्ब असे म्हणतात. वेदी कशी बांधावी? अग्निकुंडाचे मोजमाप काय असावे ? इ. माहिती शुल्बसूत्रांमध्ये येते. तर मनुष्याने समाजात वागताना कोणते नियम पाळावेत या संबंधीचे विवेचन करणाऱ्या ग्रंथांना धर्मसूत्रे म्हणतात. एकंदर, यज्ञातील शारीरिक क्रिया आणि समाजातील आदर्श वर्तन यांचा उहापोह कल्पसूत्रांमध्ये आढळतो.
 
'''३) निरुक्त:'''
ओळ ३४:
'''४) व्याकरण:'''
 
वैदिक मंत्रांचे अर्थ समजण्यासाठी निरुक्ताच्या जोडीला व्याकरणाचीही आवश्यकता असते. व्याकरणामुळे शब्दाची नेमकी जात आणि रूप ओळखता येते. [[पाणिनी]] ऋषींनी लिहिलेला [[अष्टाध्यायी]] हा ग्रंथ व्याकरणावरील सर्वोत्कृष्ट ग्रंथ समजला जातो. पाणिनीपूर्व काळातही अनेक व्याकरणकार होऊन गेले. शाकटायन, गार्ग्य, आत्रेय, शाकल्य हे त्यापैकी काही होय. पाणिनीच्या व्याकरणावर पतंजलींनी[[पतंजली|पतंजलीं]]<nowiki/>नी महाभाष्य नावाचा टीकाग्रंथ लिहिला आहे.
 
'''५) छन्दःशास्त्र:'''
ओळ ४६:
गायत्री, अनुष्टुप्, त्रिष्टुभ, जगती,उश्निह, बृहति,पङ्क्ती हे ते सात छंद आहेत.
 
'''६) [[ज्योतिष]]:'''
 
ज्योतिः म्हणजे चमकणारे, प्रकाशणारे म्हणजेच आकाशातले ग्रहगोल. त्यांचे शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र ! कोणताही विधी करण्यासाठी योग्य वेळ, योग्य [[ऋतू]] कोणता हे ज्योतिषशास्त्र सांगते. लगधाचा वेदाङ्गज्योतिष हा या शास्त्रावरील प्रसिद्ध ग्रंथ आहे. या ग्रंथाच्या दोन संस्करणे आहेत. त्यापैकी एक संस्करण ऋग्वेदाशी तर दुसरे संस्करण यजुर्वेदाशी निगडित आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|title=संस्कृत वैजयंती – इयत्ता बारावी – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,२०१३|last=|first=|publisher=|year=|isbn=|location=|pages=}}</ref>
<references />'''''टीप''': हा लेख '''[[ध्रुव नॉलेज वेल्फेअर सोसायटी|ध्रुव नॉलेज वेलफेअर सोसायटी, डोंबिवली]]''' या संस्थेच्या '<nowiki/>'''ज्ञानबोली '<nowiki/>''' या उपक्रमांतर्गत '''रिद्धी करकरे''' यांनी लिहिला आहे.''
"https://mr.wikipedia.org/wiki/वेदांग" पासून हुडकले