"गणेशलेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ १:
[[अजिंठा]] लेणीच्या डोंगरापाठीमागे असलेल्या डोंगररांगात काहीहजार वर्षापूर्वीची [[गणेशलेणी]] आहे. [[सोयगाव]] पासून दक्षिण दिशेला पाच किलोमिटर अंतरावर शहरापासून [[गलवाडा,]] [[वेताळवाडी]] मार्गाने [[गणेशलेणीच्या]] पायथ्यापर्यंत जाता येते. पायथ्यापासून पाचशे मिटर चढण अंतरावर डोंगरावर चढून गेल्यानंतर थोड्या उतारानंतर खोल दरीवजा परिसरात [[गणेशलेणी]] आहे. [[रुद्रेश्वर]] मंदिर म्हणूनही या स्थळाची ओळख आहे. गणेशलेणीत प्रवेश करताच प्रसन्न मुद्रेतील गणेशमूर्ती दिसते तर समोर सभामंडप आहे. मूर्ती डाव्या सोंडेची आहे. मूर्तीची उंची पाच फूट तर रुंदी तितकीच असावी. मूर्तीच्या पाठीमागे भूयारी मार्ग असून तो मार्ग अजिठा लेणीपर्यंत जातो असे स्थानिक सांगतात. गणेशमूर्तीच्या बाजूस दगडी बैठकीवर महादेवाची शिवलिंग आणि नंदीही आहे, त्यास [[रुद्रेश्वर]] म्हणून ओळखल्या जाते. मंदिरातच गणेशमूर्ती शेजारी कोरलेल्या दगडात [[नरसिंह]] मूर्ती, [[सप्तमातृक]] शिल्पे दिसतात. शेजारीच प्रचंड असा पाण्याचा धबधबा कोसळत असतो.[[File:Ganpati Soygago.jpg|thumb|गणेशलेणीतील-गणेशमूर्ती]]
"https://mr.wikipedia.org/wiki/गणेशलेणी" पासून हुडकले