Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ११:
=== 2.2] सामाजिक ===
 
===2.2.1] मुलमुली प्रेम करतांना जात धर्म पाहत नाही. ===
 
जगात सायन्स ने खुप प्रगती केली. त्यामुळे शहरातून खेडयाकडे टीव्ही मुळे सिनेमा आणि सीरियल घराघरत पोचले त्यात चांगले आणि वाईट दाखविल्या मुळे मुलामुलीवर चांगलाच परिणाम होत आहे.त्यात स्मार्ट मोबाईल आणि नेटने मुलामुलीना याड लावले. प्रेम आणि सेक्स हया वेगवेगळ्या पण खुप महत्वाच्या गोष्टी आहेत.त्यातुन होणाऱ्या परिणामाला अनेक पालकांना तोंड द्यावे लागते. त्यात अत्यंत महत्वाची भूमिका पोलिसांना निभवावी लागते, म्हणून पोलिसां कडून सर्व पालकांसाठी नेहमी सूचना दिली जाते.शाळा कॉलेजे संपत आले आहेत. मागील कांही दिवसा पासुन वयात आलेल्या तरुण मुली निघुन जाण्याच्या तक्रारी मध्ये व प्रकरणा मध्ये शहरा पेक्षा ग्रामीण भागातील भागात वाढ झाली आहे.मुलींनी शैक्षणिक वर्षात केलेले प्लॅनिंग प्रत्यक्षात उतरवतना दिसुन येत आहे.दहावी बारावीत मुलीची टक्केवारी लक्षवेधी असते. त्यात अशा घडलेल्या घटना मुळे काही गंभीर सामाजिक प्रश्न देखील निर्माण होतात.आणि तशातच हिंदी मराठी फिल्म इंडस्ट्रिकडून दाखविण्यात येणारे कामुक व अश्लील चिञपट, काल्पनिक लव्हस्टोरी याचा पगडा भारतातील तरुण तरूणींवर पडत असलेमुळे मुला मुलींवरील संस्कार ढासळले आहेत.या अनुषंगाने पालकांनी आपल्या पाल्यांची (मुलगा/मुलगी) खालील प्रकारे काळजी घेणे आवश्यक आहे.
मुले-मुली एकांतामध्ये फोन वरुन जेंव्हा बोलत असतात त्या वेळी त्या/ते कोणाशी आणी काय बोलत असतात हे पहावे.मी मैत्रणी/नाते वाईकाकड़े चालली आहे असे मुली पालकाना सांगुन घरातून जातात, परत येत नाहीत. अशा वेळी मुलीला एकटी न-पाठवता इतर नातेवाईका सोबत पाठवावे.
मुलगी/मुलगा घरातुन शाळा कॉलेजला जातात त्या वेळी ते घरातुन किती वाजता निघाले शाळा कॉलेज मध्येच गेले का ? किती वाजता पोहचले ? पिरेडला बसले का ? शाळा कॉलेज मधुन बाहेर कधी पडले ? सरळ घरी आले का ? किती वाजता आले ? या कड़े लक्ष देणे आवश्यक आहे. बहुतांशी मुला-मुलींनी निघुन जाण्या आगोदर मोबाइल फोनचाच वापर/आधार घेतल्याचे दिसुन येत आहे.
चैनल मिडिया आणि प्रिंट मिडिया बातम्या तुम्ही जरूर पाहली,वाचली असेल. परंतु या गोष्टीची ज्या पालकाना काळजी घेणे आवश्यक आहे.दुर्दैवाने अशा पालकाकडे सोशल मीडियाचा अभाव असतो. त्यामुळे ही बाब कृपया आपण आपला भाऊ, बहिण, मामा, मामी, मावशी, मित्र, चुलते, पुतने, शेजारी यांना अवगत करून सतर्क करावे.धक्का धक्कीच्या व धाव-पळीच्या दुनियेत पालकाना कुटुंब चालवण्यासाठी खुप आटा-पिटा करावा लागतो त्यामुळे पाल्याकड़े पुरेसे लक्ष देवु शकत नाही. परंतु लक्ष देणे खूप आवश्यक आहे.
घटना घडल्या नंतर माता-पित्यानी अश्रु ढाळण्यापेक्षा त्या आधीच काळजी घ्यावी म्हणजे समाजात (नसलेली )इज्जत जात नाही, आणि जात किती ही लपविली तरी ती जात नाही. मुलींनीही विचार करावा की ज्या माता पित्याने जन्म देऊन लहानाचे मोठे करताना मुलीचा तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळ केला.तो त्यांना उतारवयात डोळ्यात पाणी आणून रडवण्यासाठी आणि मानसिक त्रास देण्यासाठी असे कृत्य करू नये.मुलीच्या परपुरुषा बरोबर पळून जाण्याने तीच्या मागे तीच्या भावाला कुटुंबाला समाजात आत बाहेर तोंड दाखविणे अवघड होऊन जाते. त्यांच्या संपूर्ण घरावर चारिञ्यहिन घराने म्हणून ठपका बसतो.व नंतर त्या पळून गेलेल्या मुलीच्या भावाचेही लग्न ठरतच नाही.त्यामुळे पालकांनो सावधान तुमची मुलगी तुम्हाला काॅलेज एक्झाम व क्लासच्या बाहाण्याने केव्हा ही फसवू शकते हे शंभर टक्के लक्षात घ्या.एक सैराट सिनेमा पाहिल्याने रातोरात मुलमुली बिगडत नाही, त्यावर आजु बाजूच्या सामाजिक,शैक्षणिक,आर्थिक, सायन्स आणि सोशल मिडियाचा परिणाम होतो म्हणुन मुलमुली प्रेम करतांना जात धर्म पाहत नाही. म्हणुन पालकांनो मुला मुलींनी आपली सत्य संस्कृती सांगा, जात धर्म माणसाने स्वार्था करीता निर्माण केलेले आहेत.त्यामुळेच संस्कार धर्म आणि शरीर धर्म केव्हाच बिघडून टाकल्या गेला आहे.केवळ शरीराची वासना शांत करणे म्हणजे प्रेम हेच उद्धीष्ट मुला मुलींचे झाले आहे.म्हणूनच सर्वच पालकांनी सतर्क राहिले पाहिजे. मुलामुलीच्या प्रेम प्रकरणाने एक सामाजीक जबाबदारी मोठया प्रमाणात वाढते आहे, ती योग्य वेळी समजून घेतली तर देशातील जाती जातीतील प्रेम प्रकरणातून होणारे भीषण हत्याकांड थांबविता येतील.
प्रेम आणि हिंसा यांचे सर्वात मोठे प्रबोधन करणारे क्षेत्र म्हणजे सिनेमा.यात दाखविलेल्या हिंसक घटना सर्वांच्या कायमस्वरूपी लक्षात राहतात काही लोक त्यातूनच प्रेरणा घेतात.प्रेमासाठी केलेला संघर्ष आणि त्याग हे लक्षात घेतले जात नाही.'सैराट' च्या आर्चीचा परशा वरील प्रेमासाठी मंग्या भावा बरोबरच संघर्ष नंतर वडिलांच्या विरोधात पोलीस स्टेशन मध्ये प्रेमासाठी दाखविलेले धाडस का पाहिल्या जात नाही.फक्त शेवट का अंमलात आणल्या जातो?. प्रेम हे कधीच जात,धर्म आणि आर्थिक बाजू पाहून होत नसते .प्रेम हे प्रेमच असत पण जाती जातीचे प्रेम खूप हिंसक असते.प्रेम हे प्रेम असते.पण तुमचे आमचे कधीच सेम नसते. मराठा समाज हा बहुसंख्य ब्राम्हणाचा मानसिक गुलाम आहे. त्याच्या धडावर त्यांचे डोके नसते त्यातील मेंदू हा ब्राम्हणाच्या नियंत्रणात असतो.त्यामुळे ते जन्मा पासुन मरे पर्यंत त्यांनी सांगितलेल्या हिंदू धर्माच्या रीतीरिवाजानुसार संस्कारानुसार आचरण करतात. मग तो आर्ट,सायन्स,कॉमर्स कोणतीही पदवीधर असला,कितीही उच्च शिक्षित डॉक्टर,इंजिनिअर,प्राध्यापक ,वकील,आय पी एस,आय ए एस,एम डी असला तरी भटा ब्राम्हणांच्या शब्दा बाहेर वागू शकत नाही. त्याच ब्राम्हणाच्या मुली किती मुस्लिमाच्या,मागासवर्गीय समाजांच्या मुलासोबत प्रेम विवाह करून सुखाने नांदतात.एकाही भटा ब्राम्हणांनी कोणत्या मुलांचा खून हत्या करण्याची नोंद नाही.त्यामुळे त्यांची कोणतीही इज्जत गेल्याची इतिहासात नोंद नाही. पण मराठा समाजातील मुलीवर प्रेम केले म्हणूनच मागासवर्गीय मुलाचा सामूहिकरीत्या एकत्र येऊन हत्याकांड घडवून समाजाची घराण्याची इज्जत खुनी गुन्हेगार हिंस प्रवृतीचे माणस म्हणून सर्व ठिकाणी सुवर्ण अक्षरांनी नोंद करून ठेवली आहे.
शेतमजुरी आणि वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुराचा कॉलेजमध्ये जाणारा मुलगा नितीन आगे केवळ मुली बरोबर बोलतो.त्यात त्याचे प्रेम असेल या शंकेने शाळेतून वीट भट्टी पर्यंत गावातील सर्व लोकांच्या समोर मारहाण करून जीव जाये पर्यत मारल्या जातो.मुलीच्या मनाचा विचार न करता भाऊ,वडील इतर नातलग एका निरपराध मुलांना जीवे मारतात.पुढे काय?. गुन्हेगार म्हणून जेलची हवा, कुठे राहिली घराण्याची समाजाची इज्जत मुलीच्या भविष्याचे काय?.अशा अनेक घटना घडल्यावर ही काही लोकांच्या मनातील जात धर्माचा अदुष्य किडा मरत नाही.तर ते संपूर्ण मानव जातीला बदनाम करून ठेवतात.
पिंपरी- चिंचवडच्या तक्षशीलानगरच्या बौद्ध विहाराजवळ राहाणारा वीस वर्षांचा विराज जगताप कॉलेजात शिकत होता. नवी स्वप्नं बघत होता. काही नराधमांनी या कोवळ्या पोराचा जीव घेतला. अमानुष अशी मारहाण करून त्याला संपवून टाकले. कारण काय, तर विराजची एका मुलीसोबत मैत्री होती. त्यांचं एकमेकांवर प्रेम होतं.प्रेम असेल तर आईवडील भावाला प्रेमासाठी संघर्ष करणारी तिच्यातील आर्ची का पुढे आली नाही.
प्रेम करणं हा काही समाजात गुन्हा झाला आहे.या देशाचा कायदा त्यांना लागू नाही अशी त्यांची खात्री झाली आहे.म्हणून असे प्रकरण अधून मधून निर्भयपणे घडत आहेत.
प्रेम करताना जात बघायची, हा निकष त्यांनी आपल्या वयात येणाऱ्या मुलीला शिकविला पाहिजे. तरूण-तरूणी एकमेकांच्या प्रेमात पडतांना हिंसा होणार नाही यांची काळजी घेतली पाहिजे.ज्यांच्या मेंदूत उच्च,नीच,जात धर्माचे विष भिनलेले असते. ते कोणावर ही कधी ही कुठे ही असतांना प्रेम करू शकत नाही. त्यांच्या डोक्यात हिंसेचा विखार कायम धगधगत असतो.पोलीस प्रशासन व सरकारी नोकरीत असणारे असे लोक प्रत्येक ठिकाणी आपली मानसिकता दाखवून देतात.
छत्रपती शिवाजी महाराज,राजर्षी शाहूमहाराज यांच्या क्रांतिकारी विचारांची साधी ओळख या नराधमांना नाही.म्हणूनच हे मराठा जातीला ही कलंक आहेत.त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी स्वाभिमानी मराठा समाजातील जागरूक समाजसेवक,पत्रकार,संपादक,साहित्यिक विचारवंत,जाणकार राजकीय कार्यकर्ते नेते यांनी पुढे आले पाहिजे.कारण इतिहास वाचला तर इतिहास घडविता,लिहता येतो.ज्या शाहूंनी स्वतःच्या बहिणीचं लग्न धनगर जातीतल्या मुलाशी केलं होते किती नालायकांना माहिती आहे?. त्या राजर्षी शाहूंचा सोडा. मधुकर चौधरी यांच्या मुलीनी दादासाहेब रुपवते यांच्या मुला बरोबर लग्न करून आणि विलासराव देशमुखांच्या मुलांनी आंतरधर्मीय, आंतरजातीय लग्नं केली हे तरी माहिती आहे काय?. राजकारणातील जाणते राजे शरद पवारांच्या मुलीनं आंतरजातीय लग्न केलं. ब्राह्मण प्रमोद महाजनांच्या बहिणीनं वंजारी असलेल्या गोपीनाथ मुंडेंशी लग्न केलं. डॉ.पद्मसिंह पाटलांचे पुत्र राणा जगजितसिंह पाटील यांनी चांभार जातीतील मुलीशी लग्न केलं.मोहन भागवत ची पुतणी उर्मिला मातोंडकर प्रसिद्ध अभिनेती हिने मुस्लीम मुला बरोबर लग्न केले त्यांची कुठे साधी चर्चा झाली नाही.आर एस एस ,विश्व हिंदू परिषद यांनी हिंदू खतरेमे पडला नाही.किंवा लव्ह जिहाद झाला नाही. यांनी कोणीही खालची जात किंवा वरची जात असं काही पाहिले नाही. म्हणूनच लिहावावे वाटते हे कसले मराठे आणि कसले पाटील?. हे जातीला,धर्माला देशाला आणि मानव जातीला कलंक आहेत.
अशा नराधमांना पोलीस आणि न्यायलयीन यंत्रणेने कडक कारवाई करून धडा शिकविला पाहिजे.यांना साथ देणारी पोलीस प्रशासन यंत्रणा असेच वागली तर जनतेचा विश्वास पोलिसांवर राहणार नाही.
आम्ही सुवर्ण मराठा क्षत्रिय,वैश्य,ब्राह्मण म्हणजे मोठे थोरच आणि कोणी मागासवर्गीय ओबीसी विशेष बौद्ध,मांग व चांभार म्हणजे खूपच हलके. हे ज्यांच्या ज्यांच्या मनात आजही येते, जातींची उतरंड आजही जे स्वीकारतात, ते सगळे विराज जगतापचे मारेकरी आहेत. त्यांनी अशा वेळी चूप बसून राहणे म्हणजे विराज जगतापच्या मारेकरी नराधमाचे मुख समर्थन करणे होय. ब्राह्मणांना शिव्या घालताना 'शिव- शाहू-फुले-आंबेडकर' क्रांतिकारी विचारांचा पुरोगामी महाराष्ट्र सांगायचे आणि बौद्ध पोराला मारून टाकताना मात्र मनुस्मृतीला डोक्यावर घेऊन नाचायचे, हा दुटप्पीपणा बंद झाला पाहिजे. सगळे असेच आहेत असे नाही. पण जे नेहमी प्रबोधनाची परिवर्तनाची भाषा बोलणारे अशा वेळी तोंड,डोळे,कान बंद करून बसत असतील तर,निश्चितच काळजी करावे एवढे हे प्रमाण नक्कीच आहे.म्हणूनच जातीव्यवस्था आज ही देशात कायम आहे.असे म्हणता येईल.
शिवराय,शाहू,विठ्ठल रामजी शिंदे न समजलेल्यांना आता तरी मूल्यव्यवस्था समजावून सांगावी लागेल. नराधमांना वेळीच तुरूंगात डांबावे लागेल. जातीचा माज करणा-यांची नांगी ठेचावी लागेल.एक लक्षात घ्यावे लागेल. अशा जात्यंधांना जात नसते. हिंसा करून दहशत निर्माण करणारी विखारी हीच त्यांची जात असते. त्यामुळे सगळ्या जातबांधवांना आरोपी मानण्याचे कारण नाही. पण त्याच वेळी, 'हे आपल्या जातीचे आहेत', म्हणून त्यांना मदत करण्याचा वा वाचवण्याचा विचारही कोणाच्या मनात येता कामा नये.तरच आम्ही भारतीय आहोत.आणि भारतीय म्हणून जाती जातीचे हत्याकांड नुसते पाहत राहिलो तर देशातील जाती जातीतील प्रेम प्रकरणातून होणारे भीषण हत्याकांड थांबविता येणार नाहीत..
अश्वेत माणसाला गोऱ्या पोलिसांनी मारले म्हणून आख्खी अमेरिकन माणस सर्व वर्णव्यवस्था एकत्र येऊन निषेध करते. आणि भारतात?. अरविंद बनसोडे (रा- पिपळधरा ता- नरखेड, जि- नागपूर) विराज जगताप (रा- पिंपळे सौदागर, जि- पुणे) दगडू धर्मा सोनवणे (रा- महिंदळे ता. भडगाव, जि. जळगाव) साळापुरी जि- परभणी येथे पाच बौद्ध तरुणावर 15 ते 16 जातीयवाद्यांनी भीषण हल्ला केला. राहुल अडसूळ – कोरेगाव, ता.कर्जत, जि.अहमदनगर.बीड जिल्ह्यातील पारधी समाजाचे तिहेरी हत्याकांड नुकतेच महाराष्ट्रभर गाजले आहे. हा प्रकार जातीयवाद्यांकडूनच घडलेला आहे. चंदनापुरी खुर्दी, ता. अंबगड, जि. जालना येथे बौद्ध परिवाराला २०-२५ जणांच्या टोळीने मारहाण करुन जातीवाचक शिवीगाळ केली.मंठा, जि. जालना येथील दलित शिक्षकाला गावातील उच्चवर्णींयाकडून केल्या जाणाऱ्या शिवीगाळाला, मारहाणीला कटांळून त्यांना आत्महत्या करायला भाग पाडले. त्यांच्यामागे त्यांचा परिवार आहे. त्यांच्या जीवीताला धोका आहे. निळा. ता.सोनपेठ, जि. परभणी या गावातील बौद्ध महिला संरपचांना गावातील बौद्ध कुटूंबांना कोरोना काळात गावातील शाळेत क्वारंटाईने केले म्हणून मारहाण करण्यात आली. यात सरपंचाच्या पतीस बेदम मारहाण झाली आहे. गावातीव उच्चवर्णीय आरोपींवर एट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. वैजापूर, औरंगाबाद येथे आंतरजातीय प्रेम प्रकरणातून कुटूंबातील सदस्यांची हत्या करण्यात आली. नागदरा ता. परळी, जि, बीड येथे दि. १२ जून रोजी होलार समाजातील बांधवांवर हल्ला. या सारख्या प्रकरणात तरुण आजही अमानुष पद्धतीने मारले जातात. त्यांचे दुख फक्त बौद्धांनी करायचे, बाकी भारतीय अशा पद्धतीने वागतात कि आम्ही त्या गावातील राज्यातील आणि देशातील कोणी नाहीच.या अशा भयंकर घटनेमुळे तरी जातीयवाद संपायला हवा. जातीचं निर्मूलन करण्यासाठी 'माणसां'नी उभं राहायला हवं. अशा घटनांनंतर दोन जातींमधील तेढ आणखी वाढवली जाणार असेल, तर जातीअंताकडे नव्हे, जगाच्या अंताकडे आपली वाटचाल सुरू आहे. असे खेदाने म्हणावे लागेल.प्रेमावर हा देश उभा करायचा की विखारावर, याचं उत्तर आता तरी आपल्याला द्यावंच लागेल. ह्या घटना योग्य वेळी समजून घेतल्या आणि प्रबोधन केले, तर देशातील जाती जातीतील प्रेम प्रकरणातून होणारे भीषण हत्याकांड थांबविता येतील.
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९.भांडूप,मुंबई