"वड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1690655 by 2405:204:209D:940E:76C2:E135:186E:55E9 on 2019-07-05T15:43:24Z
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ५:
[[चित्र:Vadachi pane va fale.jpg|thumb|Right|250px|वडाची पाने व फळे]]
 
'''[[वटपौर्णिमा|वड]]''' (मराठी नामभेद: '''वटवृक्ष''' ; शास्त्रीय नाव: ''Ficus benghalensis'', ''फायकस बेंगालेन्सिस'' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''banyan'', ''बन्यान'' ;) हा [[भारतीय उपखंड|भारतीय उपखंडात]] आढळणारा एक मोठा वृक्ष आहे. वड म्हणजे ''फायकस'' या प्रजातीत मोडणारी ''फायकस बेंगालेन्सिस'' नावाची जात आहे. अतिविशाल, प्रचंड विस्ताराचा हा वृक्ष सर्वसाधारणपणे १५ ते २० मीटर उंच वाढतो. याच्या फांद्यांना फुटलेल्या मुळ्या जमिनीपर्यंत पोचतात. त्यांना पारंब्या म्हणतात. जमिनीपर्यंत पोचल्यावर या पारंब्यांना खोडांचा आकार येऊ लागतो व त्यातूनच झाडाच्या मुख्य खोडाभोवती बनलेल्या इतर खोडांचा विस्तार होत जातो. पारंब्या वरून खाली येतात म्हणून या वृक्षाला ‘न्यग्रोध’ असेही नाव आहे. हेे झाड सर्वप्रथम पाश्चििम बंगालमध्ये दिसेल म्हणुन बेंगालेन्सिस, तर बंगालीत व्यापा-याला बनीया म्हणतात म्हणुन बन्यायान ट्री असे इंग्ररजीत नाव आहे .
 
 
भारतातील काही शहरांत प्राचीन आणि विस्तीर्ण असे वडाचे वृक्ष आढळतात. मध्यप्रदेशातील [[छिंदवाडा]] जिल्ह्यात वडचिंचोली येथे एक वटवृक्ष अडीच एकर भूमीवर पसरलेला आहे. बिहारमधील कमिटीत गावातील वृक्ष, गुजराथमधील नर्मदेच्या मुखाजवळील कबीरवट, कलकत्त्याच्या शिवफूट बोटॅनिकल गार्डनमधील पसरलेला वड प्रचंड असून त्यांच्या छायेत चार पाच हजार लोक बसू शकतात. शिवफूट वनस्पती उद्यानातल्या वटवृक्षाचे वय ३५० वर्षे आहे. [[मद्रास]] येथील अड्यारच्या थिऑसॉफिकल सोसायटी येथे आणि [[सातारा]] शहराजवळ असेच वडाचे प्राचीन वृक्ष आहेत. तसेच [[पातूर]]जवळ असलेल्या [[अंबाशी]] येथील गावात असलेला वटवृक्षही सुमारे दिड [[एकर]] परिसरात पसरलेला आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/वड" पासून हुडकले