"केशवपन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३:
केशवपन ही केवळ ब्राह्मण समाजातच प्रचलित असलेली दुष्ट, माणुसकीशून्य आणि लाजिरवाणी रूढी होती. त्या काळी सातव्या/आठव्या वर्षी मुलींची लग्ने होत. अशा कित्येक मुलींवर तर त्या वयात येण्यापूर्वीच वैधव्य कोसळे. पण पत्नी वारली तर पुनर्विवाह करण्याचा पुरूषाला अधिकार असे. पण स्त्रीला मात्र तो अधिकार नव्हता. दुसरीकडे नवरा गेल्यानंतर अशा मुलीने पुनर्विवाह करू नये ,पवित्र राहावे, व्यभिचार करू नये म्हणून तिच्यावर जाचक बंधने असत. एक माणूस म्हणून जगण्याचा तिला अधिकार नसे.
 
हे शक्य करणासकरण्यास केशवपन (स्त्रीच्या सौन्दर्याचे वैशिष्टय असलेली डोक्यावरील सुरेख व लांब केस पूर्णपणे काढून ) हा प्रकार तिला अतिशय कुरूप करून टाकण्यासाठीच असे. याउप्पर तसे केले नाही तर तिला देवधर्म, सोवळ्यातला स्वयंपाक वगैरेला परवानगी नसे.
 
दुर्दैवाची गोष्ट म्हणजे नात्यातले, संबंधात येणारे काही पुरूष तिचा गैरफायदा घेत. त्यातून तिला दिवस गेले तर अंधाऱ्या खोलीत तिला डांबून गावठी पद्धतीने गर्भपात केला जाई. त्यात तिचा जीव जाण्याचेही प्रकार घडत.
"https://mr.wikipedia.org/wiki/केशवपन" पासून हुडकले